Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WeatherNewsUpdate : काळजी घ्या : मराठवाड्यात पुढील दोन दिवस तर विदर्भात ५ दिवस उष्णतेची लाट

Spread the love

मुंबई : उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच राज्यात  आणि खास करून मराठवाड्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भात ही लाट पाच दिवस राहिल, असे  भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान एकीकडे राज्यातील अनेक विभागाने तापमानाने उच्चांक गाठला असताना, मराठवाडा व विदर्भात उन्हाचा चटका कायम असताना कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मात्र उद्या वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील ५  दिवसांत पश्चिम राजस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेची तीव्रता असणार आहे पुढील ५ दिवसांत पूर्व राजस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती खूप जास्त आहे. तसेच दक्षिण हरियाणा-दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात वेगळ्या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीपेक्षा आणखी तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे.

तसेच पुढील ५ दिवसांत हिमाचल प्रदेश, विदर्भ आणि बिहारच्या वेगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. तर पुढील दोन-तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि जम्मूमध्ये; झारखंडमध्ये ६-८ एप्रिल दरम्यान; दक्षिण पंजाबमध्ये ७-१० एप्रिल दरम्यान; छत्तीसगडमध्ये ९-१० एप्रिल रोजी उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. येत्या ४८ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर येथे वादळी पावसाने हजेरी लावली. तसेच सांगलीत काही ठिकाणी गारपीट झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!