Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationNewsUpdate : शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांच्या ‘आधार’ला जोडणार आता ‘जाती’ आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता विद्यार्थ्यांच्या आधारकार्डला जात आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र लिंक करण्याची योजना आखली आहे. यामुळे सरकारला स्वयंचलित पडताळणी प्रणाली तयार करण्यास मदत होणार असून थेट  ६० लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जात आणि उत्पन्नाची प्रमाणपत्रे आधारशी जोडल्यानंतर, स्वयंचलित पडताळणी प्रणाली कार्यान्वित होऊन  योग्य लाभार्थ्यापर्यंत त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत पोहोचू शकेल असे सरकारचे म्हणणे आहे. 

यासंदर्भात इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, सरकार जात आणि उत्पन्नाची प्रमाणपत्रे आधारशी जोडण्याची तयारी करत आहे.  यामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ६० लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभ मिळू शकेल. देशात सर्वप्रथम राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाया राज्यात या स्वयंचलित पडताळणी प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येईल. कारण या राज्यांनी जात आणि उत्पन्न प्रमाणपत्रे आधारशी जोडण्याचे काम पूर्ण केले आहे. या व्यवस्थेमुळे पात्र मुलांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळू शकेल.

शिष्यवृत्तीसाठी  आता असेल डिजिटल प्रणाली

एका सरकारी अधिकाऱ्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  इकॉनॉमिक टाईम्सने आपल्या या वृत्तात म्हटले आहे  की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सचिवांसोबत केलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत अनुसूचित जातीच्या मुलांना मॅट्रिक (दहावी) नंतर दिली जाणारी शिष्यवृत्ती प्रणाली पूर्णपणे डिजीटल करण्याची सूचना करण्यात आली. या सूचनेनंतर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात ही योजना लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सध्या अनेक विद्यार्थ्यांना  मॅट्रिकच्या आधी किंवा नंतर सरकारकडून शिष्यवृत्ती मिळत असल्याची एकत्रित माहिती उपलब्ध होत नाही. बर्‍याच प्रकरणांमध्ये, मंत्रालयाला समान बँक खाते दहावी आणि बारावीच्या  विद्यार्थ्यांशी जोडलेले आढळले, यावरून असे दिसून येते की ती खाती संस्थेद्वारे ठेवली जातात आणि त्यांचा विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. पण आता त्यांना आधारशी लिंक केल्यानंतर शिष्यवृत्ती थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात पोहोचेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!