Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkraineCrisisUpdate : मोठी बातमी : युक्रेनमधील खार्किव येथे गोळीबारात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू , ‘ऑपरेशन गंगा’ ची मोहीम अधिक तीव्र …

Spread the love

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन (रशिया-युक्रेन) यांच्यातील सशस्त्र संघर्ष अधिक तीव्र झाला असून युक्रेनमध्ये  अजूनही १५ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना घरी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत आता हवाई दलावर एअर लिफ्ट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याअंतर्गत आतापर्यंत हजाराहून अधिक विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात आले आहे. दरम्यान युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना युक्रेनसह विविध मुद्द्यांवर माहिती दिली.


‘ऑपरेशन गंगा’मध्ये आता हवाई दलाचाही सहभाग

दरम्यान ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून सुरू असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कमी कालावधीत अधिक लोकांना बाहेर काढलं जाऊ शकतं. भारतीय हवाई दल आजपासून ऑपरेशन गंगाचा भाग म्हणून अनेक सी-१७ विमाने तैनात करण्याची शक्यता आहे.

युक्रेनमधील यद्धची परिस्थिती लक्षात घेता  भारताने आज आपल्या सर्व नागरिकांना युक्रेनची राजधानी कीव सोडण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाच्या ताज्या सल्ल्यानुसार, विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना आज तात्काळ कीव सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व भारतीयांनी आज युक्रेनची राजधानी कीव सोडली पाहिजे. कीवमधून बाहेर पडण्यासाठी ते ट्रेन, बस किंवा कशाचीही मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान भारतीय दूतावासाने कालच विद्यार्थ्यांना कीवमधील रेल्वे स्टेशनवर जाण्यास सांगितले असले तरी त्यांना कोणाकडूनही मदत होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत. कीव मधील  रेल्वे स्थानकाच्या सल्लागाराने सांगितले की, लोकांना पश्चिमेकडील सेक्टरमध्ये नेण्यासाठी युक्रेनने विशेष निर्वासन गाड्यांची व्यवस्था केली आहे. “आम्ही सर्व भारतीय नागरिकांना/विद्यार्थ्यांना शांत, शांत आणि एकजूट राहण्याची मनापासून विनंती करतो. रेल्वे स्थानकांवर मोठ्या गर्दीची अपेक्षा केली जाऊ शकते, म्हणून, सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी संयम राखावा आणि विशेषतः आक्रमक वर्तन दाखवू नये.

यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पासपोर्ट, पुरेशी रोख रक्कम, चांगले आणि योग्य कपडे सोबत ठेवण्यास सांगण्यात आले. अॅडव्हायझरीमध्ये, विद्यार्थ्यांना ट्रेनला उशीर किंवा रद्द होण्याची आणि लांब रांगांलागू शकतात त्यामुळे संयम बाळगावा. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात परत आणण्यापूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना हंगेरी, पोलंड, रोमानिया, स्लोव्हाक रिपब्लिक यांच्यासह  युक्रेनच्या  सीमा शेअर करणारे सर्व देश – येथे नेले जात आहेत. भारत सरकारने ऑपरेशन गंगाचा एक भाग म्हणून युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी एक  ट्विटर हँडल देखील तयार केले आहे.

भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य :  किरेन रिजीजू

दरम्यान गोळीबारामुळे आज खार्किवमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. खार्किवमधील बिघडलेली परिस्थिती ही गंभीर चिंतेची बाब आहे. त्या शहरातील भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि सुरक्षा याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, आम्ही स्लोव्हाकियामधील संपूर्ण निर्वासन ऑपरेशनमध्ये समन्वय साधू आणि युक्रेनमधून येणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसासाठी त्यांच्या सरकारकडून सहकार्य घेऊ. त्यांना सुरक्षितपणे परत आणणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे  केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत ते स्लोव्हाकिया इथं जात आहेत.

रुमानियामधून भारतीयांना घेऊन आलेलं विमान दिल्लीत दाखल

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन येणारे एक विमान दिल्लीत दाखल झाले आहे. रुमानियामधून हे विमान दिल्लीत आलं असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या विमानातील नागरिकांचे मायदेशात स्वागत केले. सर्व भारतीयांना मायदेशी आणण्याचे भारत सरकार सर्व प्रयत्न करत असल्याचे मांडविया यांनी म्हटले आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हंगेरीतल्या बुडापेस्टला जात आहेत.

युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांना मोदींचे फोन

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने हलचाली सुरु केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीमध्ये याच विषयावर एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये पाठवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीयांच्या देशात स्थलांतराच्या प्रक्रियेच्या समन्वयासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीनंतर सोमवारी रात्री उशीरा पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीयांना बाहेर पडण्यासाठी मदत करुन आश्रय देणाऱ्या युक्रेन शेजराच्या देशांच्या पंतप्रधानांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे आभार मानले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!