Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UPElectionUpdate : उत्तर प्रदेशात १६ जिल्ह्यात ५९ मतदार संघासाठी ५७ टक्के मतदान

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा  निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज  16 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडले . यामध्ये 13 आरक्षित जागांचा समावेश आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 57.3 टक्के मतदान झाले आहे. तर 2017 च्या निवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 62.1 टक्के मतदान झाले होते. उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यांमध्ये एटा आघाडीवर असून कानपूरमध्ये सर्वात कमी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण ६२७ उमेदवार  रिंगणात आहेत.


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजेपर्यंत 8.15% 11 वाजेपर्यंत 21.18 , दुपारी 1 वाजेपर्यंत 35.88 टक्के मतदान झाले, जे दुपारी 3 वाजेपर्यंत 48.81 टक्क्यांवर पोहोचले. हाथरसमध्ये 50.15 टक्के, फिरोजाबादमध्ये सरासरी 51.23 टक्के, कासगंजमध्ये 50.75 टक्के, एटामध्ये 53.23 टक्के, मैनपुरीमध्ये 52.44 टक्के, फारुखाबादमध्ये 46.19 टक्के, कन्नौजमध्ये 50.23 टक्के, इटावामध्ये 50.42 टक्के, कनौजमध्ये 50.42 टक्के, कानपूरमध्ये 47.41 टक्के, ए. जालौनमध्ये 46.87 टक्के, झाशीमध्ये 48.52 टक्के, ललितपूरमध्ये 59.13 टक्के, हमीरपूरमध्ये 50.74 टक्के, महोबामध्ये 51.72 टक्के मतदान झाले.

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे भाऊ अभय राम यादव यांनी आज सैफई येथे मतदान केले. त्याचवेळी सपा प्रमुख अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादवही मतदानासाठी आले. राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज एनडीटीव्हीशी संवाद साधताना, तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात त्यांच्या पक्षाने “शतक” पूर्ण केल्याचा दावा केला. पहिल्या दोन टप्प्यात त्यांच्या आघाडीला 100 हून अधिक जागा मिळतील, असे ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!