Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshElectionUpdate : भाजपच्या जाहीरनाम्यात “लव्ह जिहाद” कायद्यासह हे आहेत महत्वाचे मुद्दे !!

Spread the love

नवी दिल्ली : यूपी निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.  गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर आदींच्या उपस्थितीत हा जाहीरनामा जारी करण्यात आला.


दरम्यान या जाहीरनाम्यासोबतच भाजपने ‘कर के देखा है’ हे नवीन निवडणूक गाणेही लाँच केले आहे. ठरवले ते करून दाखवू, भाजपच  येणार, असे या गीतात म्हटले आहे.  भाजपने आपल्या जाहीरनाम्यात “लव्ह जिहाद” चा मुद्दाही प्रामुख्याने उपस्थित केला आहे. पक्षाने महिलांसाठी दिलेल्या आश्वासनांवर ‘सशक्त होगी नारी… असे नमूद केले आहे.

गेल्या  15 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘लोक कल्याण संकल्प पत्र’साठी अपेक्षा असा ‘बॉक्स लॉन्च ”  करून राज्यभरातून सूचना मागवल्या होत्या. उत्तर प्रदेश क्रमांक-1 ‘सूचना तुम्हारा , संकल्प हमारा’ या थीमवर आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील 30 हजार ग्रामपंचायती, सर्व विधानसभा मतदारसंघ आणि महानगरांमधील विविध सामाजिक आणि आर्थिक वर्गातील लोकांशी संवाद साधून सूचना मागवण्यात आल्या. यासोबतच कॉल आणि ई-मेलद्वारेही सूचना घेण्यात आल्या होत्या.

लखनौ – उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी मतदानाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे सादर केले आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपने उत्तर प्रदेशसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. लोककल्याण संकल्प पत्र या नावाने भाजपने उत्तर प्रदेशातील जनतेला जाहीरनाम्यात अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. त्यात, लव्ह जिहादच्या मुद्द्याचाही समावेश आहे.

जाहीरनाम्यात  दिलेली आश्वासने अशी आहेत….

> सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल
> विधवा निवृत्ती वेतन दरमहा 1500 पर्यंत वाढवले ​​जाईल (सध्या 800)
> महिलांना होळी आणि दिवाळीला दोन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत
> ६० वर्षांवरील महिलांना सरकारी वाहतुकीत मोफत प्रवास
> विद्यार्थ्यांना स्मार्टफोन दिले जातील
> प्रत्येक घरात एका तरुणाला सरकारी किंवा स्वयंरोजगाराची संधी दिली जाईल.
> महाविद्यालयीन मुलींना मोफत स्कूटी दिली जाईल
> अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधणार
> गरीब मुलींच्या लग्नासाठी 25000 रुपये दिले जातील (पूर्वी रु. 15000 ) दिले जात होते.
> सर्व सार्वजनिक आणि शैक्षणिक संस्थांजवळ सीसीटीव्ही बसवले जातील
> प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येणार आहे
> 25 नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील.
> UPSC, CLAT, NEET, TET, UPPSC, NDA ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल
> लव्ह जिहाद करणाऱ्यांना 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख दंड
> दिव्यांगांचे पेन्शन दरमहा 1500 रुपये करण्यात येणार आहे
> सर्व बांधकाम कामगारांना मोफत विमा
> सर्व बांधकाम कामगारांच्या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल

आपलं सरकार

Click to listen highlighted text!