Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaCourtNewsUpdate : परळी गंगाखेड रोड वरील तिहेरी खून प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

Spread the love

बीड : अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात परळी गंगाखेड रोड वरील तिहेरी खून प्रकरणातील आरोपीची सबळ पुराव्या अभावी न्या.एस.एस.सापटनेकर यांनी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यातील आरोपीचे नाव नागनाथ राजाराम घुगे रा. तळेगाव ता.परळी वैजनाथ असे आहे.


या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, दि.१६/१२/२००९ रोजी आरोपी नागनाथ घुगे व भानुदास चाटे, (रा. मांडवा ता.परळी) मंचक घुले, बालाजी तिडके, शिवाजी नागरगोजे रा. शेंडगा ता.गंगाखेड यांनी परळी गंगाखेड रस्त्यावर सपना हॉटेलवर मद्यपान केले व सोळंके धाब्यावर जेवण केले, त्याठिकाणी आरोपी व भानुदास चाटे यांच्यामध्ये जुन्या पैशाच्या कारणावरून भांडण सुरू झाले, त्यावेळी बालाजी तिडके याने आरोपीस चापट मारल्याचा राग येऊन आरोपीने तुमची बघतोच असे म्हणून त्याची स्वतःची जीप चालू करून वरील लोकांच्या अंगावर घातली त्यावेळी भानुदास चाटे, (रा. मांडवा ता.परळी) मंचक घुले, बालाजी तिडके, रा. शेंडगा ता.गंगाखेड हे जागेवरच मयत झाले व शिवाजी नागरगोजे हा रस्त्याच्या बाजूला असल्याने जखमी झाला होता, त्यामुळे वरील लोकांचा आरोपीने खून केला म्हणून शिवाजी नागरगोजे याने फिर्याद दिल्यावरून आरोपी नागनाथ घुगे विरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. र.नं.२०२/२००९ नुसार ३०२,३०७ भा. दं. वी.अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात येऊन प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयात वर्ग झाले.

सदरील प्रकरणात मा.न्यायालयात एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले, फिर्यादी पक्ष गुन्हा सिद्ध न करू शकल्याने व आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद व बचाव गृहीत धरून आरोपी नागनाथ राजाराम घुगे रा. तळेगाव ता.परळी वै. याची कलम ३०२,३०७ भा. दं. वी. मधून सबळ पुराव्याअभावी न्यायाधीश एस.एस.सापटनेकर यांनी दि.२५/०१/२०२२ रोजी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात आरोपीतर्फे अँड.डी. व्ही. गाडे,अँड.बी. जी.केंद्रे यांनी काम पाहिले त्यांना अँड.डी. एम. काचगुंडे, अँड.एस.एम.पाटील, अँड.ए. डी. शेरेकर,अँड.सुरज घाडगे, अँड.जी. आर.खांडेकर, अँड.पोपट अँड.पोपट कसबे यांनी सहकार्य केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!