Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित सायबर प्रकरण आहे तरी काय ?

Spread the love

मुंबई : सध्या मुंबईच्या किल्ला कोर्टात एक प्रकरण चालू आहे . राज्याचे विरोधी पक्ष नेते , माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांना दाखवलेली कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह आणि नंतर केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेली कागदपत्रे पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात एसआयडीमधून चोरीला गेली होती, अशी माहिती  राज्य सरकारने शुक्रवारी या कोर्टाला दिल्यामुळे मोठी चर्चा सुरु झाली आहे.


राज्य सरकारने आज कोर्टात दिलेल्या माहितीनुसार राज्य गुप्तचर विभागाकडून हा गोपनीय डेटा  अज्ञात व्यक्तीने  चोरला आणि तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला. आणि हा संपूर्ण प्रकार म्हणजे बौद्धिक संपदेच्या चोरीचे प्रकरण असल्याचे महाराष्ट्र सरकारने कोर्टात म्हटले आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलकडून फडणवीस यांना हि माहिती देणाऱ्या  अज्ञात व्यक्तीविरुद्ध अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत या प्रकरणाचा तपास करत आहे, त्याने तपास पूर्ण करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून काही कागदपत्रे मागवली होती. परंतु कागदपत्रे न मिळाल्याने राज्य सरकारने किल्ला न्यायालयात धाव घेऊन फडणवीस यांनी केंद्र सरकारला दिलेली कागदपत्रे आणि पेनड्राइव्ह जमा करण्याचे आदेश केंद्राला दिले. दरम्यान  न्यायालयाला दिलेल्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याचा अर्ज अस्पष्ट आणि असमर्थनीय असल्याचे म्हटले आहे.

आमचा अर्ज अस्पष्ट नाही…

याबाबत मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, “ही कागदपत्रे आमच्या खटल्याशी संबंधित आहेत की नाही हे आम्ही तपासू इच्छितो. केंद्राकडे आम्हाला ते देण्यास नकार देण्याचे कोणतेही वैध कारण नाही. तपास तार्किक निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी आम्हाला या डेटाची आवश्यकता आहे. केंद्राकडून आम्हाला काय हवे आहे, ते आम्ही स्पष्टपणे नमूद केले आहे, त्यामुळे आमचा अर्ज अस्पष्ट नाही,” असे शुक्रवारी राज्य सरकारचे वकील अजय मिसार यांनी न्यायालयात सांगितले.

दरम्यान मुंबई सायबर सेलच्या माध्यमातून राज्यानेही न्यायालयाला कळवले की देवेंद्र फडणवीस हे या खटल्यातील सर्वात महत्त्वाचे साक्षीदार आहेत, परंतु अनेक समन्स बजावूनही फडणवीस न्यायालयात हजर झाले नाहीत आणि आणखी वेळ मागत आहेत. मार्चमध्ये, फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर बदली रॅकेटचा आरोप केला होता.

नवाब मलिक यांचा फडणवीसांवर हल्ला

या प्रकरणावर बोलताना राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह दाखवला त्या पेनड्राईव्हाचा सोर्स काय आहे? हे त्यांनी सांगणे  बंधनकारक आहे. त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन भरती, बदल्या यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यांनी स्वत: सांगितले  होते  की माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे आणि ते मी केंद्रीय यंत्रणांना देणार आहे. आता हा  पेनड्राईव्ह त्यांना  कुणी दिला याची माहिती देणे हे बंधनकारक आहे. तसेच, शासकीय कार्यालयातून छुप्या पद्धतीने जर कोणी काही माहिती पेनड्राईव्हमध्ये घेतली असेल आणि ती माहिती त्यांच्याकडे आली असेल तर ती कोणी दिली याची माहिती देणं हे बंधनकारक आहे. डेटा लिकचा धंदा बऱ्याचसा धंदा या राज्यात झालेलाच आहे. काही ओएसडी लोकांनी डेटा चोरलेला देखील आहे याची देखील आज ना उद्या चौकशी सुरू होईलच.” असेही मलिक यांनी म्हटले आहे.

नेमके काय झाले होते ?

देवेंद्र फडणवीस यांनी दि . २३ मार्च २०२१ रोजी घेतलेल्या  एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी काही कागदपत्रे आणि तत्कालीन एसआयडी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ तयार केलेल्या अहवालांकडे लक्ष वेधताना सादर केले होते तसेच  त्यांनी असा दावा केला होती की, राज्याने अहवालावर कारवाई केली नाही आणि म्हणून ते पेन ड्राईव्हसह संपूर्ण साहित्य गृहमंत्रालयाकडे सोपवणार आहेत.

दरम्यान आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा समावेश असलेल्या राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) कागदपत्रे  गहाळ प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आले आहे. सायबर सेलने साक्षीदार म्हणून त्यांचे  म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले  असल्याची माहिती शुक्रवारी  कोर्टात दिली. फडणवीस यांनी मार्चमध्ये दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कागदपत्रे मागण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांच्या याचिकेवर न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे.

यावर फडणवीसांचे म्हणणे असे आहे …

या वादावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि , “मला सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलं नसून एक प्रश्नावली पाठवली आहे. त्यानंतर सायबर सेलचं एक पत्र मिळाले  असून त्यावर योग्यवेळी बोलेन. न्यायालयीत प्रकरणानंतर त्यावर मी बोलेनच. विरोधी पक्षनेता म्हणून भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचा माझा अधिकार आहे. त्यासाठी माहिती कुठून मिळाली हे विचारण्याचा सरकारला अधिकार नाही.”

फडणवीस कशाला घाबरत नाहीत : चंद्रकांत पाटील

या प्रकरणावर एका वृत्त वाहिनीशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे कि , कोर्टाने बोलावल्यानंतर आपण मुदत मागू शकतो, त्यानुसार त्यांनी मुदत मागितली की नाही याची कल्पना नाही.  ते कशाला घाबरत नाहीत. त्यामुळे ते कोर्टासमोर जातील, त्यात काळजी करण्याचे  काही कारण नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!