Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील तालिबानी , राजदचे नेते जगदानंद सिंह यांची टीका

Spread the love

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या खास निकटवर्तीयांपैंकी एक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी बुधवारी एका जाहीर सभेत बोलताना ‘तालिबान ही संस्कृती आहे’ असे म्हणतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली आहे. पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान जगदानंद सिंह बोलत होते. तालिबान्यांकडून ज्याप्रमाणे नि:शस्त्र लोकांवर हल्ले केले जातात त्याचप्रमाणे संघींकडून गरीब लोकांना मारहाण केली जाते, अशी टीका सिंह यांनी आरएसएस वर केली आहे.

आपल्या भाषणात सिंह म्हणाले कि , ‘तालिबान हे केवळ एक नाव नाही तर अफगाणिस्तानातील एक संस्कृती आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातला तालिबानी आहे. हे लोक इतरांची दाढी कापतात. बांगड्या विकणाऱ्या आणि गाड्यांचं पंक्चर काढण्यासारखं काम करून मेहनत करून खाणाऱ्या लोकांना मारहाण करतात. मग अशा लोकांविरोधात आम्ही उभे राहणार नाही का… हेच तर जनतेच्या नेत्याचं कर्म आहे’.

‘जगदानंद यांच्यावर भाजपची टीका

दरम्यान जगदानंद सिंह यांच्या या वक्तव्यावर माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी प्रत्यूत्तर देताना म्हटले आहे कि , ‘लालू यांच्या कुटुंबाची भक्ती, पुत्र मोह आणि वोटबँकेचं राजकारण करताना जगदानंद इतकी खालची पातळी गाठतील याचा कुणीही विचार केला नसता. राजदच्या छोट्या राजकुमारांच्या इच्छेनुसार काम करण्यासाठी आणि मोठ्या राजकुमारांकडून सतत अपमानित होण्याच्या दबावाखाली जगदानंद आपलं मानसिक संतुलन हरवत चालले आहेत. यासाठी ते हिंसाचारावर विश्वास ठेवणाऱ्या क्रूर तालिबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करत आहेत’.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!