Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

Advertisements
Advertisements
Spread the love

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक चव्हाणांच्या नांदेड येथील घरावर ही दगडफेक झाली आहे. एका अनोळखी महिलने ही दगडफेक केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या महिलेने केलेल्या दगडफेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनची काच फुटली आहे. या दगडफेकीत कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisements

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेने दगडफेक केली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. दगडफेक करणारी महिला कोण होती याची माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र ही महिला मनोरुग्ण असल्याचं बोललं जात आहे. दगडफेकीच्या या घटनेनंतर अशोक चव्हाण यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्यावेळी या महिलेने दगड भिरकावण्यास सुरुवात केली त्यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला रोखले. मात्र, एक दगड हा थेट सुरक्षा रक्षकांच्या केबिनवरील काचेवर लागला आणि काच फुटली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!