Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोनबाधितांच्या संख्येत किंचित वाढ , १२६ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

मुंबई: राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात १२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १७० इतकी होती. तसेच, आज बरे होणाऱ्या रुग्णाची संख्या ४ हजार ४५५ इतकी आहे. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र किंचित वाढली असली तरी आज राज्यात एकूण ४ हजार ८३१ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४ हजार ६५४ इतकी होती.

दरम्यान आज राज्यात झालेल्या १२६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर गेला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ५९ हजार ९०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांच्या वर

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार ८२१ वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार ०५४ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात ७ हजार १५१ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ३५६ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ४ हजार ७७२ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार २६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ३ हजार ९८० इतके रुग्ण आहेत. मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ३ हजार ४०६ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ००४, सिंधुदुर्गात १ हजार ०२४, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ०७१ इतकी आहे.

दरम्यान नंदुरबारमध्ये आज पुन्हा एक रुग्ण आढळून आला असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४२०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७५ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९ वर खाली आली आहे. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वात कमी रुग्णसंख्या असून येथे फक्त एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३४ लाख ५६ हजार ४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ५२ हजार २७३ (१२.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९२ हजार ५३० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ३५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!