Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात सहाव्या लसीला मंजुरी , १२ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांचेही होणार आता लसीकरण

Spread the love

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण प्रगतीपथावर असताना , ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने जायडस कॅडिलाच्या या लसीच्या आत्पकालीन वापरास अखेर मंजुरी दिली असल्याचे वृत्त आहे. ही लस १२ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांना देण्यात येणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे. जायडस कॅडिलाच्या डीएनएवर आधारीत जगातील हि पहिली लस आहे. ही लस ६६ टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात ५० हून अधिक केंद्रांवर या लसीची सर्वात मोठी क्लिनिकल ट्रायल करण्यात आली असून कोरोनावरील बहुतेक लसी या दोन डोसच्या आहेत. पण जायडस कॅडिलाची ही लस तीन डोसची आहे. अहमदाबादमधील या औषध कंपनीने १ जुलैला लसीच्या आपत्कालनी मंजुरीसाठी DCGI कडे अर्ज केला होता.

 

दरम्यान जायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , कोरोनाविरोधातील लढाई भारत पूर्ण सामर्थ्याने लढत आहे. डीएनएवर आधारीत कोरोनावरील पहिल्या लसीला मंजुरी मिळणे म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे यश आहे. ही अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

खास इंजेक्टरद्वारे दिली जाते हि लस

जायडस कॅडिलाच्या कोरोनावरील लसीला मंजुरी मिळाल्याने देशात आतापर्यंत एकूण ६ लसींना मंजुरी दिली गेली आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक व्ही, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला यापूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. जायडस कॅडिलाचा ही लस डीएनएवर आधारीत जगातील पहिली लस आहे. या लसीद्वारे जेनेटिकली इंजीनियर्ड प्लास्मिड्सला शरीर इंजेक्ट केले जाते. यामुळे शरीरात करोनाच्या स्पाइक प्रोटीनची निर्मिती होते आणि व्हायरसपासून बचावासाठी अँटीबॉडी तयार केली जाते. ही लस सुईने नाही तर एका खास इंजेक्टरद्वारे दिली जाते. यामुळे लस घेताना फारशी वेदना होत नाही. तसेच या लसीचे साईड इफेक्टही कमी आहेत, असा दावा कंपनीने केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!