Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 43 जणांना डिस्चार्ज , 30 नव्या रुग्णांची नोंद

Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार नऊ कोरोनामुक्त, 301 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 43 जणांना (मनपा 15, ग्रामीण 28) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार नऊ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 771 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 461 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 301 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (08)
कमल नयन बजाज हॉस्पीटल परिसर 1, पुडंलिक नगर 1, उल्का नगरी 1,मुकुंद नगर 2, अन्य 3
ग्रामीण (22)
औंरगाबाद 1, फुलंब्री 2, गंगापूर 2, वैजापूर 14, पैठण 3
मृत्यू (02)
घाटी (02)
1. 55,पुरुष, शिरुर बंगला, वैजापूर
2. 55, स्त्री, उमरावती, फुलंब्री

जिल्ह्यातील 957679 जणांचे कोविड लसीकरण.

औरंगाबाद :  जिल्ह्यात दि.13 जुलै 2021 पर्यंत एकूण 957679 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असून दि. 13 जुलै रोजी एकूण 8929 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 3116 जणांनी तर शहरात 5813 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
दि. 13 जुलै 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 360980 जणांनी पहिला डोस घेतला तर 94458 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 455438 जणांचे लसीकरण झाले आहे.
तर शहरामध्ये 377315 जणांनी पहिला डोस घेतला तर 124926 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 502241 जणांचे लसीकरण झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!