Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जागतिक बँकेचे शिक्षण सल्लागार म्हणून डिसले गुरुजींची नियुक्ती

Spread the love

ग्लोबल टीचर म्हणून ७ कोटींचा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून२०२१ ते जून २०२४ या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेच्यावतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत उपक्रमाला चालना देण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची मानण्यात येत आहे.

जगभरातील मुलांच्या शैक्षणिक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील १२ व्यक्तीची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणाऱ्या 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजी यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!