Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भावी गुरुजींसाठी आनंदाची बातमी !!

Spread the love

भावी शिक्षक होणाऱ्या इच्छुकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate) वैधता आता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. यामुळे शिक्षकी पेशा निवडण्याऱ्या इच्छुकांना फायदा होणार आहे. यापूर्वी या प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षांसाठी होती. या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही, तर इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय बदलत प्रमाणपत्राची वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली आहे.

या निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावासह २०११ या वर्षांपासून हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी २०११पासूनचे उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहेत. “शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यामुळे रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होईल”, असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं.

शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी आणि करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. २०११ या वर्षानंतर ज्या उमेदवाराचे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र बाद झालं आहे. अशा सर्व उमेदवारांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!