Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात एकूण १,५२,७३४ लाख नवीन कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.  गेल्या ४७ दिवसातील हि सर्वात कमी संख्या आहे. दरम्यान  बाधित रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी मृत्यूंच्या आकडेवारीत घट होतांना दिसत नाही. गेल्या २४ तासात ३,१२८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या गेल्या २४ तासात २,३८,०२२ रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात सध्या कोरोनाची एकूण २०,२६,०९२ सक्रिय प्रकरणे आहेत. आतार्यंत देशात २,८०,४७,५३४ रुग्ण आढळले. तसेच २,५६,९२,३४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतार्यंत ३,२९,१०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. देशात अनेक राज्यात लसीकरण केंद्र बंद पडले आहे. देशात कासव गतीने लसीकरण होत आहे. आतापर्यंत २१,३१,५४,१२९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!