Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : धक्कादायक : लसीकरणाचा वेग मंदावल्याने देशाची चिंता वाढली !!

Spread the love

नवी दिल्ली । देशात लसीकरण वाढले तर कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल असे सांगितले जात असताना , भारताची स्थिती अत्यंत गंभीर आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे, तर याउलट लसीकरणाचा वेग मात्र अत्यंत कमी आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीपासून लसीकरणाचा वेग कमी होत असल्याचे चित्र आहे. कारण, लस बनवणाऱ्या कंपन्यांनाही मागणीनुसार पुरवठा आणि आयात वाढवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

5 एप्रिलला दररोज होणाऱ्या लसीकरणाची संख्या 45 लाखावर पोहोचली होती, मात्र आता हा आकडा सरासरी 25 लाखावर आला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव जाणवत आहे. सरकारी कोविन पोर्टलवरील  https://dashboard.cowin.gov.in आकडेवारीनुसार, जगभरात सर्वाधिक लसी बनवण्याची क्षमता असलेल्या भारतानं आपल्या 1.35 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 9.5% लोकांनाच लस दिली आहे. म्हणजेच आतापर्यंत केवळ दहा टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे.
लसीची निर्मिती करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांची लस बनवण्याची क्षमता केवळ 7 ते 8 कोटी प्रति महिना इतकीच आहे. ही क्षमता वाढवण्यासाठी त्यांना आणखी काही महिने किंवा त्याहून अधिकचा काळ लागणार आहे. मात्र, 1 मेपासून 18 वर्षावरील लोकांसाठीचं लसीकरणही सुरू झालं आहे. त्यामुळे, लसींचा तुटवडा जाणवत आहे. यानंतर लस घेणाऱ्यांची एकूण संख्या 80 कोटीवर पोहोचली आहे. दरम्यान रशियाच्या स्पुतनिक 5 या लसीचे 1.5 लाख डोस शनिवारी भारतात पोहोचले आहेत. सरकारनं म्हटलं आहे, की आणखी लाखो डोस भारतात येणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!