Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देशात लॉकडाऊनसाठी केंद्रावर वाढता दबाव, सुप्रीम कोर्टाचाही लॉकडाउनचा सल्ला

Spread the love

नवी दिल्लीः देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना केंद्र सरकारवर लॉकडाउनसाठी दबाव वाढत चालला आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने देशात लॉकडाउन घोषित केल्यानंतर या निर्णयावर जोरदार टीका झाली होती. पण या उलट आता केंद्र सरकार लॉकडाउनसाठी दबाव वाढत आहे. रविवारी सुप्रीम कोर्टाने एक आदेश जारी केला. जनहिताचा विचार करता करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनच्या पर्यायावर विचार करावा, असा असल्ला सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिला.


दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही राज्यात लॉकडाउनची घोषणा केली आहे. बिहारमध्ये १५ मेपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात येत असल्याचे नितीशकुमार यांनी आज सोशल मीडियावरून जाहीर केले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, गोवा, कर्नाटक आणि झारखंडमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाउन घोषत करणारे बिहार हे देशातील ९ वे राज्य ठरले आहे. दरम्यान, कोविड टास्ट फोर्सने देशात कडक लॉकडाउन घोषित करण्याची सूचना केंद्र सरकारला केल्याचं सांगण्यात येतंय. यासंबंधी टास्ट फोर्सकडून केंद्राला अहवालही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्योग क्षेत्राकडून संपूर्ण लॉकडाउनची मागणी
लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होते. गेल्या वर्षी आपल्याला याचा अनुभव आला आहे. तरीही देशातील सर्वामोठी औद्योगिक संस्था चेंबर ऑफ सीआयआयने देशात व्यापक पातळीवर आर्थिक हालचालींवर मर्यादा आणावी, अशी मागणी केली आहे. देशातील नागरिकांसमोर येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमवीर सरकारने निर्णय घ्यावा, असे सीआयआयने म्हटले आहे. तर देशातील व्यापाऱ्यांची संघटना सीएआयटीने आधीच लॉकडाउनचं समर्थन केले आहे.

दरम्यान कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंजिया ट्रेडर्सने (कॅट) एक सर्वेक्षण केले आहे. यात ६७.५ टक्के नागरिकांनी देशात लॉकडाउन लावण्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी ज्या प्रमाणे लॉकडाउन लावण्यात आला. तसाच लॉकडाउन लावावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे, असा दावा सर्वेक्षणून करण्यात आला आहे. सर्वेक्षणात दिल्ली आणि देशातील ९११७ जणांनी आपली मतं मांडली आहेत. देशात करोनाने स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे ७८.२ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर ६७.५ टक्के जणांच्या मते देशात लॉकडाउन घोषित करण्याच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे, असे कॅटचे अध्यक्ष बी.सी. भारतीय आणि प्रवीण खंडेलवाल म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले- संपूर्ण लॉकडाउन हाच एकमेवर मार्ग
देशातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही देशात लॉकडाउन हाच एकमेव मार्ग उरला असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणीही केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!