Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोनाचा नवा विषाणू तरुणांसाठी अधिक घातक

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या कोरोना विषाणूच्या तीव्रतेमुळे चिंतेत वाढ झाली असून  हा करोना व्हेरियंट आंध्र प्रदेशमध्ये आढळून आला आहे. या विषाणूला N44OK असे  शास्त्रीय नाव देण्यात आले  आहे. या विषाणूची तीव्रता १५ पटीने अधिक असल्याचं सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीलतील शास्त्रज्ञांनी सांगितलं. या विषाणूमुळे ३ ते ४ दिवसात रुग्ण बाधित होतो.

Advertisements

N44OK हा करोनाचा विषाणू B.1.617 आणि B.1.618 व्हेरियंटपेक्षा अधिक घातक असल्याच दिसून आले  आहे. या  विषाणूची  रुग्णांना लगेच बाधा होत असल्याचे  समोर आले  आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ३ ते ४ दिवसातच रुग्णाची स्थिती खालावत असल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस तरुणांमध्ये मोठ्या संख्येने पसरत आहे. त्याचबरोबर व्यायाम आणि रोग प्रतिकारशक्ती अधिक असलेल्या लोकांवरही भारी पडत आहे.

Advertisements
Advertisements

विशेष करून दक्षिण भारतात N44OK हा व्हायरस आपले पाय पसरत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दक्षिण भारतात B.1, B.1.1.7, B.1.351,B.1.617 आणि B.1.36 (N44OK) या व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळत आहेत. देशात B.1.1.7 या व्हेरियंटची सर्वाधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र आता समोर आलेला विषाणू सर्वाधिक घातक असल्याचे  अभ्यासातून समोर आले  आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणं गरजेचे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!