Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दिलासादायक : यंदा देशात समाधानकारक पाऊस

Spread the love

नवी दिल्ली : देशात या वर्षासाठी होणाऱ्या पावसाच्या बाबत  केंद्रीय हवामान विभागाकडून  दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या ९८ टक्के म्हणजेच  समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील  परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले  असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवला जातो. यात एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील, याविषयी सविस्तर माहिती दिली जाते.


असा असतो अंदाज आणि पावसाची टक्केवारी


सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज : कमी पाऊस 

सरासरीच्या ९० ते ९६ टक्क्यांच्या मध्ये पावसाचा अंदाज : सामान्यपेक्षा कमी पाऊस 

सरासरीच्या ९६ ते १०४ टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज :  सामान्य  पाऊस 

सरासरीच्या १०४ ते ११० टक्क्यांमध्ये पावसाचा अंदाज : अतीवृष्टी


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!