Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ExamNewsUpdate : देशातील NEETPG – 2021 आणि ICSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षाही लांबणीवर

Spread the love

नवी दिल्ली : देशात  वाढत असलेल्या कोरोना  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारने सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला असताना, NEETPG – 2021 परीक्षाही  पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर आता ICSE बोर्डाकडून देखील दहावी व बारावीच्या परीक्षासुद्धा  पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यातील पहिल्या आठवड्या परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. ४ मे पासून ही परीक्षा सुरू होणार होती.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने NEETPG – 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय़ घेतलेला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. असे  ट्विट करत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!