AurangabadNewsUpdate : ताजी बातमी : सुधारित आदेश : औरंगाबादेतील संचारबंदी ३० नव्हे तर ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून

पेट्रोल पंप सर्व नागरिकांसाठी सकाळी ८ ते १२ या वेळेत चालू राहतील
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या सुधारित आदेशानुसार दि. ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून सुरु करण्यात आलेले लॉक डाऊन आता नव्या आदेशानुसार ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून सुरु होऊन ते दि. ९एप्रिलच्या २४.०० वाजेपर्यंत सुरु राहील असे कळविण्यात आले आहे. आधीच्या आदेशानुसार मंगळवार दि. ३० मार्चच्या रात्री ८ वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु राहतील.
दरम्यान या नव्या आदेशात आणखी महत्वाचे बदल म्हणजे कोणत्याही परीक्षांना हे आदेश बाधित करणार नाहीत मात्र विद्यार्थ्यांनी ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक आहे. तसेच या काळात पेट्रोल पंप सर्व नागरिकांसाठी सकाळी ८ ते १२ या वेळेत चालू राहतील तर दुपारनंतरमात्र अत्यावश्यक सेवेसाठी चालू राहतील. याशिवाय हॉटेल्सना रात्री ८ वाजेपर्यंत पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी हे नवीन आदेश निर्गमित केले आहेत.
या आधीच्या आदेशात लॉक डाऊन च्या दरम्यान ओळखपत्राशिवाय सर्वांना पेट्रोल देण्यास प्रशासनाने मज्जाव केला होता त्यामुळे पेट्रोलपंपावर भांडणे वाढली होती. याबाबत संघटनेचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शहरातील सर्व नागरिकांना निर्धारित वेळेत पेट्रोल डिझेल देण्याची मागणी केली होती हि मागणी नव्या बदलात मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.