Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : परमबीरसिंग यांच्या अटकेची शक्यता एनआयए ने वर्तवल्यामुळे देशमुखांचा बदल्यांचा खेळ !!

Spread the love

औरंगाबाद – आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांच्या अटकेची शक्यता राष्ट्रीय  तपास यंत्रणेने वर्तवल्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिंग यांची उचलबांगडी केली अशी माहिती महानायक ऑनलाईनशी बोलताना वरिष्ठ सूत्रांनी दिली.

२५ फेब्रू. ला अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटिन नी भरलेलीजीप सापडली. हा तपास तत्कालीन पोलिसआयुक्त परमवीरसिंग यांनी गुन्हेशाखा युनिट १ किंवा २ यांना द्यायला हवा  होता, किंवा एटीएस कडे द्यायला हवा होता. पण तसे न करता सिंग यांनी क्राईम इंटलिजन्स युनिट ला हा तपास दिला. ही बाब आय.बी. च्या अधिकार्‍यांच्या निर्दशनास आली.त्यानंतर त्यांनी याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली.

केंद्रीय गृहमंत्रालयाने याप्रकरणी एनआयएचा ही अहवाल मागवला होता.दोन्ही यंत्रणांनी एकच अहवाल दिल्यामुळे तत्कालीन पोलिसआयुक्त परमवीरसिंग यांनी जबाबदारी सांभाळतांना हलगर्जीपणाचा कळस केल्याचा ठपका आय.बी. आणि एनआयए यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात केला होता.त्यामुळे एनआयएने परमवीरसिंग यांच्या अटकेची शक्यता वर्तवताच अनिल देशमुख यांनी घाईघाईत मुख्रमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत सिंग यांना गृहरक्षक दलाची जबाबदारी देत नगराळेंना मुंबई पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी दिली. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उत्तर देणे टाळले.

आणखी दोन अधिकारी चौकशीच्या रडारवर

दरम्यान मुंबईमध्ये स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणी पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे  यांना अटक झालानंतर दररोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणीत आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) कारवाईचा फास आणखी आवळला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. त्यांची चौकशी सुरू असून मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिशनर मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही  एनआयए बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसांत चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

परमजित सिंग आणि वाझे यांचे कनेक्शन

एनआयएच्या तपासानुसार सचिन वाझे हे गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)मध्ये नियुक्त होते. हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट सिपी मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे वाझे यांना बंधनकारक होते मात्र, सचिन वाझे हे थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांच्या संपर्कात होते. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कामाची कार्यपद्धती काय होती हे एनआयएच्या अधिकाऱ्यांना जाणून घेत आहेत.

पब्लिसीटीसाठी केला असावा स्टंट

दरम्यान, NIA च्या आधिकाऱ्यांनी सचिन वाझेंच्या घराची झाडाझडती केली होती. त्यावेळी एक ड्रेस जप्त करण्यात आला आहे. स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासाठी दोन ड्रेस वापरण्यात आले होते. त्यातला एक शर्ट मुलूंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. बुधवारी रात्री वाझेंच्या घराच्या झडतीत एक कार जप्त केली आहे. या कारमध्ये काही महत्वाचे पुरावे सापडले आहे. अन्य इतर 3 कारचा शोध NIA कडून सुरू आहे. सचिन वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो NIA च्या ताब्यात आहे. ती व्यक्ती पोलीस दलातील असल्याची माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. हा संपूर्ण कट फक्त पब्लिसीटीसाठी केला असल्याची NIA ला दाट शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!