Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका, शिवसैनिक संभ्रमात

Spread the love

औरंगाबाद – शहरात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत शिवसेना नेते महाविकास आघाडीसोबंत तर विद्यमान मंत्री आणि आमदार भारतीय जनता पक्षासोबत युती करुन निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेच्या या भूमीकेमुळे शिवसैनिक मात्र संभ्रमात पडला आहे की नेमका प्रचार कुणाचा करायचा ?

आज संध्याकाळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबंत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका  स्पष्ट केली.यावेळी काॅंग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड आणि माजी शहराध्यक्ष नामदेव पवार उपस्थित होते. दरम्यान  खैरे यांनी या वेळी आ.दानवेंविषयी नाराजी व्यक्त केली.

विशिष्ट म्हणजे नामदार अब्दुल सत्तार, नामदार संदीपान भुमरे आणि आ.अंबादास दानवे हे भारतीय जनता पक्षासोबंत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत स्वतंत्र उमेदवार उभे करुन निवडणूक लढवत आहेत.या विषयी आ.दानवे यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले महाविकास आघाडी म्हणजे काय, सुभाष झांबडकिंवा नामदेव पवार हे काँंग्रेसचे पदाधिकारी आहेत का ? राष्ट्रवादी  काँंग्रेस चे कोणी पत्रकार परिषदेत उपस्थित होते का ? याचा अर्थ एकच की, सहकार क्षेत्रात राजकारण नसते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!