Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सचिन वाझेंनी केला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धक्कादायक आरोप

Spread the love

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्यावर  कट रचून हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान वाझे यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धक्कादायक आरोप केला आहे.

सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धक्कादायक संदेश दिला आहे. त्यांनी  व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून असे म्हटले आहे की, माझेच अधिकारी मला फसवत आहेत. मला खोट्या केसमध्ये अडकवले जात आहे. 3 मार्च 2014 ला सीआयडी मधील अधिकाऱ्यांनी मला खोट्या केसमध्ये अटक केली होती. आता तोच इतिहास पुन्हा रिपीट होत आहे. तकसेच यामध्ये त्यांनी आता जगण्याची शक्ती शिल्लक नसल्याचे म्हटले आहे. आता पोलीस सेवाही नाही आणि जगण्याची सहनशक्तीही नाही. आता जगाला गुडबाय करण्याची वेळ जव्हळ आली आहे.

मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात कधीही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर शुक्रवारी 12 मार्च रोजी सुनावणी झाली. सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी करणारा युक्तीवाद  न्यायालयात करण्यात आला. त्यानुसार या प्रकरणातील महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तपास अधिकाऱ्यांचे या अटकपूर्व जामीन अर्जावर काय म्हणणे आहे, ते पुढील सुनावणीत मांडले जावे असे आदेश माननीय न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार सचिन वाझे यांनी केलेल्या सचिन वाझेंच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर 19 मार्च रोजी होणार आहे.

एकाच दिवसात वाझे यांची दोनदा बदली करण्यात आली. शुक्रवारी सचिन वाझे यांची मुंबई पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्र विभागात बदली करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.  त्यानंतर नव्या माहितीनुसार तिथूनही सचिन वाझे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे. SB 1 म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी त्यांना पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्रात सेवेत राहतील. यावरुन त्यांना कोणते अधिकारी पाठिशी घालत आहे ही चर्चा सुरू झाली होती.

सचिन वाझे गेल्यावर्षी 16 वर्षांनी पोलीस दलात परतले होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययू युनिटचे एपीआय असणारे सचिन वाझे मुंबईत सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत होते. मात्र आता हा तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला. शुक्रवारी वाझेंची बदली देखील करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!