Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या मागासवर्गीयांना आरक्षणाचा लाभ नाही : रविशंकर प्रसाद

Spread the love

नवी दिल्ली :  इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या मागासवर्गीयांना आरक्षणाचा लाभ देण्यात येणार नाही. तसेच अनुसूचित  जातींसाठी आरक्षित असलेल्या लोकसभेच्या अथवा राज्यसभेच्या जागांवरूनही त्यांना निवडणुका लढवता येणार नसल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत दिली.

भारतीय जनता पक्षाचे सदस्य जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना अन्य आरक्षित जागांवरून निवडणुका लढवण्यासाठी असलेल्या पात्रतेबाबत प्रश्न विचारला होता. “ज्या लोकांनी हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म स्वीकारला आहे ते अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवरुन निवडणुका लढवू शकतात. याव्यतिरिक्त या धर्माचा स्वीकार करणाऱ्या लोकांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल,” असेही प्रसाद म्हणाले. “संविधान (अनुसूचित जाती ) आदेश, पॅरा ३ अनुसूचित जातींची राज्यवार सूचींची व्याख्या सांगते. या अंतर्गत कोणताही व्यक्ती हिंदू, शीख अथवा बौद्ध धर्मापेक्षा वेगळ्या धर्माचा स्वीकार करतो तो अनुसूचित जातीचा सदस्य मानला जाणार नाही. वैध अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासोबत कोणतीही व्यक्ती आरक्षित असलेल्या जागांवरून निवडणुका लढवण्यासाठी पात्र आहे,” असे  उत्तर प्रसाद यांनी आरक्षित क्षेत्रावरून निवडणुका लढवण्याच्या प्रश्नावर दिले.

दरम्यान सरकार लोकप्रतिनिधीत्व कायदा आणि निवडणुकीच्या नियमांमध्ये काही दुरूस्ती करण्याचा विचार करत आहे का ?  ज्यात स्पष्टपणे ख्रिस्ती आणि इस्लाम हा धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीच्या आरक्षित जागांवरुन निवडणूक लढण्यासाठी पात्र नसतील,” असा प्रश्नही  जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी सरकारला विचारला. यावर उत्तर देताना सहकारने ” नाही ” असे  म्हणत असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचेही स्पष्ट केले.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!