Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते : शरद पवार

Spread the love

सोलापूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्यक्ष उत्तर न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले. दरम्यान केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत  काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवर भाष्य करताना ते म्हणाले कि , रॅलीतील काही उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर धुडगूस घातला होता. ते  किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते.

सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप करताना  ते म्हणाले कि , प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला,  त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली .  यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले आहे.

दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. मालाला योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार केवळ आश्वासनेच देत आहे. प्रत्यक्षात काहीही करत नाही, असेही पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!