Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रात्री उशिरा गावाकडे जायला एसटी नाही म्हणून, बस स्थानकातून एसटीच पळवली

Spread the love

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकावर, रात्री उशिरा गावाकडे जायला एसटी नाही म्हणून बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  दारुच्या नशेत तरुणांनी हे कृत्य केल्याचे वृत्त आहे.

रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्याने दारुच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोरात धडक बसल्याने विजेचा खांब कोसळला व  विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. बस स्थानकात झोपलेल्या चालक आणि वाहकाला पहाटेच्या सुमारास एसटी जागेवर नसल्याचे समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान नुसार औराद पोलिसांनी एसटीचा शोध घेतल्यानंतर शेळगी गावात ही एसटी बस सापडली.
या घटनेत एसटीचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्याने गुन्हाच नोंदवलेला गेला नाही. या प्रकरणामुळे एसटी खात्याचा हलगर्जीपणा समोर आला आहे. परंतु एसटी नेमकी कोणी पळवून नेली? एसटी पळवणाऱ्यांना पोलीस प्रशासन आणि एसटी खातं पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे का ? असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान संबंधित एसटी बस स्थानक छोटे असल्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे एसटी पळवून नेणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यास अडचण येऊ शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!