Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रामेश्वरम येथे उपग्रह प्रक्षेपित करणार्‍या मनपा विद्यार्थ्यांना किट वाटप व प्रवासासाठी शुभेच्छा

Spread the love

भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन द्वारा आयोजित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब चॅलेंज २०२१ अंतर्गत 100 उपग्रह तयार करून दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथून अवकाशात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.हा जागतिक विक्रम होणार आहे.

पुणे येथे कार्यशाळाा

या प्रक्षेपणाच्या पूर्वतयारीसाठी पुणे येथे १९ जानेवारी २०२१ रोजी कार्यशाळा होणार आहे. सदर कार्यशाळेसाठी मनपा. औरंगाबाद शाळेतील दहा विद्यार्थी निघाले आहेत.

मा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार या विद्यार्थ्यांना प्रस्थनापूर्वी अतिरिक्त आयुक्त 2  रविंद्र निकम , उपायुक्त  सुमंत मोरे, उपायुक्त  विक्रम दराडे, शिक्षणाधिकारी  रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी  संजीव सोनार व प्रकल्प समन्वयक शशिकांत उबाळे यांनी शुभेच्छा दिल्या . सोबतच प्रवासाची किट दिली यामध्ये गणवेश ट्रॅक सूट शूज ट्रॅव्हल बॅग प्रशासनाच्या वतीने भेट देण्यात आल्या याप्रसंगी मुख्याध्यापक डॉक्टर संपत ईधाटे, श्रीमती उर्मिला लोहार श्रीमती संगीता ताजवे व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!