Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime news update: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

Spread the love

चोरट्यांचा धुमाकुळ, तीन दुचाकी लंपास

औरंंगाबाद : शहर परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथील रहिवासी जालिंदर मच्छिंद्र पवार (वय ३०) हे १६ जानेवारी रोजी नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले असता चोरट्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीडब्ल्यू-२२३८) लिंबेजळगाव येथील स्मशानभूमीजवळून चोरून नेली. पुनमचंद खंडूसिंग चांदुरे (वय ४७, रा.भक्तीनगर, पिसादेवी रोड) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीके-७१६१) चोरट्याने १३ जानेवारीच्या मध्यरात्री सिडको एन-४ परिसरातील मानसी हॉटेलजवळून चोरून नेली. सनी सुभाष राणा (वय ३२, रा.संभाजी कॉलनी, सिडको) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीएम-९४१२) चारेट्याने ११ जानेवारी रोजी सिडको एन-६ परिसरातील महाराष्ट्र पब्लिक स्वूâलजवळून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे वाळूज, पुंडलिकनगर आणि सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उघड्या घरातून ६४ हजाराचा ऐवज लंपास

औरंंगाबाद : सातारा परिसरातील तक्रारदार महिलेच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधुन घरात शिरलेल्या चोरट्याने सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण ६४ हजार २८९ रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार महिलेच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार २८ डिसेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ या काळात घडला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अरविंद चव्हाण करीत आहेत.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार दांम्पत्य जखमी

औरंंगाबाद : बचत गटाच्या कामानिमित्ताने पिसादेवी येथे जाणाऱ्या दांम्पत्यास भरधाव टेम्पाने धडक देऊन जखमी केले. हा अपघात १२ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पिसादेवी रोड येथील धनगर मळ्यासमोर घडली. या अपघातात साहेबराव भोकरे पाटील (रा. राजे संभाजी कॉलनी, जळगाव रोड, जाधववाडी) व त्यांची पत्नी हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अक्षय साहेबराव भोकरे पाटील (वय २८, रा. राजे संभाजी कॉलनी, जळगाव रोड, जाधववाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक प्रदिप पळसकर (रा.पिसादेवी रोड) यांच्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनामास्क फिरणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

औरंंगाबाद : भांगसीमाता गड परिसरातील करोडी येथे असलेल्या शेतवस्तीवर विनामास्क फिरणाऱ्या पाच युवकांवर पोलिसांनी दौलताबाद पोलिस ठाण्यता गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १७ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. मोहम्मद असलम अश्रफ मोतीवाला, मोहम्म्द अश्फाक मोहम्मद अश्रफ, शेख फैसल शेख अन्वर, मोहीयोद्दीन फारोकी आरेफउद्दीन फारोकी, शेख नदीम शेख मोईन (वय २५, रा. सुभेदारी गेट हाऊस परिसर) अशी विनामास्क फिरणाऱ्या युवकांची नावे आहेत.

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

क्रूझर जीप खरेदी करण्यासाठी माहेराहुन दोन लाख रूपये आण असे म्हणत तक्रारदार विवाहितेचा छळ करून दुसरे लग्न करणााऱ्या्या पतीसह तीन जणांविरूध्द वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत जगन्नाथ गायकवाड, जगन्नाथ आबाजी गायकवाड आणि एक महिला असे विवाहितेचा छळ करणााऱ्यांची नावे आहेत. विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना १७ एप्रिल २०११ ते १ जानेवारी २०२० या काळात घडली. दरम्यान, तक्रारदार विवाहितेच्या पतीने विवाहितेस घराबाहेर हाकलून देत दुसरे लग्न केले असल्याचे तक्रारदार विवाहितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वडापाव न दिल्याने डोके फोडले

औरंंगाबाद : उधार वडापाव का देत नाही असे म्हणत चार जणांनी लाकडी दांड्याने मारहाण करून वडापाव विक्रेत्याचे डोके फोडल्याची घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रांजणगाव रोडवरील एफडीसी कॉर्नर येथे घडली. आशीष विकास रोकडे (वय १८, रा.विश्वविजय सोसायटी, खंडोबा मंदिरासमोर, बजाजनगर) यांच्या भावाला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या चार जणांविरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव कारच्या धडकेत मुलगा जखमी

औरंंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत तक्रारदार महिलेचा अल्पवयीन मुलगा जखमी झाला. हा अपघात १७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते पुणे रोडवरील पंढरपुर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदीरासमोर घडला. याप्रकरणी तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कार क्रमांक (एमएच-१७-बीव्ही-३६०३) चा चालक संजय रामजी वाघमारे (वय ४६, रा.पुâलदगाव, ता.नेवासा,जि.अहमदनगर) यांच्याविरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुत्रा घरात शिरल्याने युवकास मारहाण

औरंंंगाबाद : पाळीव कुत्रा घरात शिरल्याच्या कारणावरून चार जणांनी रोहीत मनोहर लोखंडे (वय १९, रा.कोकनवाडी) या युवकास शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. ही घटना १६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोकणवाडी भागात घडली. रोहीत लोखंडे याने दिलेल्या तक्रारीवरून अंबादास, अंबादास भाऊजी अजय त्रिभूवन व दोन महिला यांच्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडेगावात घरफोडी करीत चोरट्यांनी दुचाकी लांबवली

औरंंगाबाद : पत्नी आजारी असल्याने रूग्णालयात गेलेल्याचे घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम ५५ हजार रूपये आणि सोने-चांदीचे दागीने व त्यांच्या घराशेजारी राहणाNयाची दुचाकी असा एवूâण १ लाख ७२ हजार रूपये विंâमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीचा हा प्रकार १७ जानेवारी रोजी सकाळी पडेगाव परिसरातील भकतूल नगर येथे उघडकीस आला.
पडेगाव परिसरातील भकतूल नगर येथील रहिवासी शांतीलाल जयवंतराव निकम (वय ३४) यांची पत्नी आजारी असून तिच्यावर शहानुर मियॉ दर्गाह परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. १६ जानेवारी रोजी रात्री शांतीलाल निकम हे आजारी पत्नीला भेटण्यासाठी दवाखान्यात गेले होते, ते दुसNया दिवशी सकाळी घरी परत आले. त्यावेळी घराचा दरवाजा त्यांना तुटलेला दिसला, निकम यांनी घरात जावून बघितले असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी निकम यांच्या घरातून रोख रक्कम ५५ हजार रूपये आणि सोने-चांदीचे दागीने असा ऐवज चोरून नेला. तसेच निकम यांच्या घराजवळ राहणाNया बाबुराव तुकाराम ढेपे यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीव्ही-९८६२) चोरून नेली.
याप्रकरणी शांतीलाल निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!