IndiaNewsUpdate : पारधी समाजातील पहिल्या महिला डॉ. शुभांगी चव्हाण यांना समाज गौरव पुरस्कार

लातूर : डॉ. शुभांगी चव्हाण यांचे शैक्षिणक व सामाजिक कार्याची दखल घेवून जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेने त्यांना या वर्षीचा समाज गौरव पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. दर वर्षी महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार पारधी समाजातील पहिल्या महिला पीएच. डी. असलेल्या डॉ. शुभांगी चव्हाण यांना हा पुरस्कार दिला आहे. लवकरच हा पुरस्कार त्यांना भव्य समारंभात दिला जाणार आहे. असे पत्रक या परिषदेचे अध्यक्ष राम गायकवाड सचिव डॉ. सुरेश वाघमारे तसेच बसवंतप्पा उबाळे व यू.डी. गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिले आहे.