Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : “त्या” पाच पोलिस कर्मचार्‍यांची शिक्षा थांबवली – डाॅ. निखील गुप्ता

Spread the love

औरंगाबाद – तत्कालिन पोलिसउपायुक्त राहूल खाडे यांनी नोव्हेंबर२०मधे पाठवलेल्या अहवालावरुन सातारा पोलिस ठाण्याच्या पाच कर्मचार्‍यांच्या केलेल्या बदल्या आपण थांबवल्या आहेत. खाडेंनी पाठवलेला अहवाल पुन्हा तपासला जाणार आहे.अशी माहिती पोलिसआयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी महानायकशी बोलताना  दिली.

नोव्हेंबर २० मधे सातारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी मच्छींद्र ससाणे, प्रदीप ससाणे, सखाराम सानप,शैख कैसर शेख फतरु, विलास वैष्णव या पाच कर्मचार्‍यांच्या बाबतीत झोनक्र २ चे उपायुक्त राहूल खाडेंनी पोलिसआयुक्तांना अहवाल पाठवला होता की,सातारा पोलिस ठाण्याचे पाचही कर्मचार्‍यांचे गुन्हेगारांशी संबंध आहेत.त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात काम करणे जिकरीचे होईल.त्यानंतर पोलिसउपायुक्त मीना मकवाना यांनी पाचही कर्मचार्‍यांना मुख्यालयी हजर होण्याचे लेखी आदेश दिले. पण अहवाल तपासत असतांना अहवालाबाबत मिळालेली गोपनीय  माहिती आणि अहवालात समाविष्ठ केलेल्या मुद्यांची सुसंगती लागत नव्हती. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या बदल्या आपण थांबवल्या आहेत. त्यांच्या आदेशावर आपण अद्याप सही केली नाही.कारण अहवालाबाबत काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.त्याबाबत आढावा घेत आहोत त्या पाचही पोलिस कर्मचार्‍यांची पुन्हा नव्याने चौकशी करण्यात येईल असे शेवटी डाॅ. गुप्ता म्हणाले.

काय आहे  प्रकरण ?

महानायकला मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात गोलवाडी शिवारात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर खुनाचा प्रयत्न झाला होता. यामधे फिर्यादीने  क्लब चालक देवीसिंग मुंगसे (४२) रा. बेगमपुरा याच्याकडे क्लब सुरु ठेवण्यासाठी हप्त्याची मागणी केली होती. त्यामुळे चिडून मुंगसेने  फिर्यादी विलास मोरे(३४) याला चार साथीदारांच्या मदतीने लोखंडी राॅड व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

या प्रकरणात देवीलाल मुंगसै, अनिल सूर्यवंशी(४२) रा.तावेगाव,गणेश मुंगसे(२९),संदीप दशरथ मुंगसे (३२) लालचंद सलामपुरे (४६) तिघेही रा. गोलवाडी यांना सातारा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नात अटक झाली हौती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी पोलिसआयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांना हा प्रकार सांगितला. ही कुणकुण तत्कालिन उपायुक्त डाॅ.राहुल खाडेंना लागताच त्यांनी  सातारा पोलिस ठाण्याच्या पाच पोलिस कर्मचारी सखाराम सानप, मच्छींद्र ससाणे, प्रदीप ससाणे,विलास वैष्णव, शेख कैसर शेख फतरु यांचे गुन्हेगाराशी निकटचे संबंध आहेत म्हणून  १२नोव्हेंबर रोजी मुख्यालयात बदली केली होती. दरम्यान ही सर्व माहिती पोलिसआयुक्तांच्या विशेष पथकातील काही कर्मचार्‍यांना समजली व त्यांनी पोलिसआयुक्त डाॅ.गुप्ता यांच्या कानावर घातल्याने स्वतः आयुक्तांनी या प्रकरणात तपास करीत संबंधित पोलीस कर्मचारी दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणार   नाही असे स्पष्ट केले आहे.

शहरात ३६पोलिस चौक्या कार्यान्वित करण्याचे आदेश जारी

औरंगाबाद -शहरातील ३६पोलिस चौक्या कार्यान्वित करण्याचे आदेश दिलेले आहेत. सकाळी १०ते रात्री १० या वेळैत चौक्यांमधे १पोलिस उपनिरीक्षक आणि ५ कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी दिली.

पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील बीट मार्शल ही संबंधीत पोलिस चौक्यांच्या संपर्कात राहतील जेणे करुन नागरिकांना पोलिसांशी संपर्क करतांना अडचणीचे वाटू नये. शहरातील ज्या चौक्यांमधे कर्मचारी कार्यरत असतांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देत आहोत.असेही डाॅ.गुप्ता म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!