Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : भारत बंद हाणून पाडण्याचे भाजपचे आवाहन

Spread the love

औरंगाबाद : देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा विरोध करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत.  नरेंद्र मोदी देशाच्या शेतकऱ्याचे उत्पन्न डबल झालं पाहिजे, त्याच्या आर्थिक स्थिरता,सुबत्ता आली पाहिजे, त्यांच्या हातामध्ये अधिक पैसा आला पाहिजे व त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे,या व्यापक दृष्टीकोणातून,व शेतीमध्ये नवीन गुंतवणूक झाली पाहिजे या सर्व व्यापक दृष्टिकोनातून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषि बिल पारित केले आहे, हे कृषि बिल पारित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नवीन बदल दिसणार आहेत.

आर्थिक स्थिती सुधारणार आहे,व त्याचे उत्पन्न दुप्पट होणार आहे. या सर्व बाबींमुळे देशभरातील शेतकरी कष्टकरी कामगार हे नरेंद्र मोदींना जनसमर्थन करेल व येणाऱ्या निवडणुकीमध्ये या विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही,अशी स्थिती निर्माण होईल त्यामुळे जाणीवपूर्वक समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने नवीन कृषी बिलाला विरोध करण्यासाठी सर्व डाव्या संघटना व काँग्रेस प्रेरित संघटना भारत बंद करण्याचे आवाहन करत आहेत,पण जनता अधिक सक्षम हुशार आहे.त्यांना या मधील सर्वांचे आर्थिक हितसंबंध, एपीएमसी मधील त्यांचा आर्थिक भ्रष्टाचार बंद होणार आहे, त्या मुळे हा कायदा अत्यावश्यक आहे.

हा कायदा टिकला पाहिजे, राहिला पाहिजे, त्यासाठी सर्व जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे परंतु काही ठराविक राजकीय संघटना,डाव्या संघटना व काँग्रेस प्रणित संघटना, समाज व शेतकऱ्यांमध्ये चुकीचा प्रचार करत आहेत, त्यांना वाटतच नाही की शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा झाला पाहिजे ,शेतकरी सुधारला पाहिजे,हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर करत आहेत त्यामुळे यांनी जो देशव्यापी बंद पुकारलाय त्या बंदला औरंगाबाद  जिल्ह्यांमधील शेतकरी कष्टकरी कामगार यांनी अजिबात बंद’मध्ये सहभागी होऊ नये, त्यांना थारा देऊ नये व यांचा बंद हाणून पाडावा असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!