AuranngabadNewsUpdate : उच्चन्यायालयाकडून आॅनलाईन सुनावणीची जेष्ठ वकीलांची विनंती अमान्य

औरंगाबाद – उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांनी औरंगाबाद खंडपीठातील वकीलांनी केलेल्या आॅनलाईन सुनावणी सुरु ठेवण्या संदर्भात केलेली विनंती अमान्य केली आहे. औरंगाबाद, नागपूर आणि मुंबईतील जेष्ठ वकीलांनी न्या. दत्ता यांना विनंती केली होती. दरम्यान १ डिसेंबर पासुन सर्व वकीलांनी प्रत्यक्ष कोर्टात हजर राहून कामकाज करावे. कोरोना संसर्गाच्या काळात आॅनलाईन सुनावणी होऊन खंडपीठ आणि उच्च न्यायालयाचे कामकाज सुरु होते.कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर न्या. दत्ता यांनी विधीज्ञांनी १डिसेंबर पासुन प्रत्यक्ष कोर्टात हजर राहुन कामकाज करण्याच्या आदेशानंतर जेष्ठ विधीज्ञांनी आॅनलाईन कामकाज करण्यास प्राधान्य देत न्या. दत्ता यांना तशी विनंती केली होती. पण ती अमान्य करण्यात आली. आपत्कालिकन परिस्थितीच असे निर्णय घेतल्या जाऊ शकतात असा खुलासा शेवटी न्या. दिपंकर दत्ता यांनी केला