Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पोलिसांकडून सत्कार झालेल्या सत्कारमूर्तीला मोबाईल चोरी प्रकरणात बेड्या.

Spread the love

औरंगाबाद : पोलिसांकडून सत्कार स्विकारल्यानंतर दारु पिण्यासाठी २७हजारांचा मोबाईल चोरणार्‍या रिक्षाचालकाला वाळूज औद्योगिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.या सत्कारमूर्तीला बेड्या ठोकतांना पोलिसांनाही थोडे वाईट वाटले.पण नाईलाज होता. गेल्या नोव्हेंबर महिन्यात विश्र्वास चंद्रसेन वंजारे नावाच्या गृहस्थाचा मोबाईल अशोक बबन पानखेडे(१९) रा.रांजणगाव याने दारु पिण्यासाठी पैशे नसल्यामुळे चोरला.वंजारे हे रांजणगावातील क्लिप्टन वाईन शाॅपमधे पार्सल घेण्यासाठी आले होते.चोरी करतांना ही घटना सी.सी. टि.व्ही. कॅमेर्‍यात सुध्दा आली नव्हती.

दरम्यान पोलिस तपास सुरु असतांना पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी वाईनशाॅप वरील नेहमीच्या गिर्‍हाईकांशी संवाद साधला व चोरटा फोन सहित पकडला. पण पकडल्यानंतर पोलिसांनाही अटक करतांना वाईट वाटले. कारण तीन महिन्यांपूर्वी रांजणगावात बिहारी कुटुंब राहात असतांना त्यांच्यात वाद झाले. रागाच्या भरात नवरा बायकोला सौडून बिहारकडे निघून गेला. ती भरकटलेली विवाहिता पायी चालत वाळूज पर्यंत आली. त्या ठिकाणी मोबाईल चोर अशोक पानखेडे रिक्षासह उभा होता.

भरकटलेली विवाहिता पाहून त्याने तिला रिक्षात बसवून पंढरपूरच्या ओएसिस चौकात बंदोबस्तावर असलेले वाहतूक पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्याकडे सोपवले. उदार यांनी दामिनी पथकाला बोलावून त्या विवाहितेला वाळूज औद्योगिक पोलिसांच्या हवाली केले. पोलिस निरीक्षक सावंत यांनी तत्परतेने भरकटलेल्या विवाहितेच्या बिहार मधील नातेवाईकांना बोलावून तिथल्या पोलिसांशी संपर्क करत सुखरुप तिला तिच्या पालकांपर्यंत पोहोचवले. हे सत्कार्य करण्यात मोबाईल चोर अशोक पानखेडे याचा सिंहाचा वाटा होता. म्हणून मधुकर सावंत यांनी पानखेडेचा पोलिस ठाण्याच्या वतीने सत्कारही केला होता. शेवटी कायद्यानुसार अशोक पानखेडेला बेड्या ठोकल्याच !

चंदनचोर पुंडलिकनगर पोलिसांच्या जाळ्यात , दोन साथीदार फरार

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागातून चंदनाचे झाडे चोरी करणा-या तिघापैकी एकाला पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले, तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी ठरले. नसीब खॉ मुनीर खॉ (वय २२, रा.माऊली आडगाव) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चंदन चोरट्याचे नाव असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी शनिवारी (दि.५) कळविली आहे.

शहराच्या विविध भागातून चंदनाची झाडे चोरून नेणारे तिघे सावंगी बायपास रोडने येणार असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश सांगळे, बाळासाहेब चौरे, जालिंदर मांन्टे, मुळे, जाधव, अजय कांबळे, गणेश डोईफोडे, गायकवाड, राजेश यदमळ आदींच्या पथकाने ४ डिसेंबरच्या रात्री सावंगी बायपासवरील आडगाव माऊलीकडे जाणाNया रोडवर सापळा रचून दुचाकीवर आलेल्या नसीब खॉ मुनीर खॉ याला पकडले. तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पोलिसांनी नसीब खॉ मुनीर खॉ याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ चंदनाचे झाड कापण्यासाठी लागणारी करवत मिळून आली.

चोरलेले चंदन विकले १६०० रूपये किलोने

नसीब खॉ मुनीर खॉ व त्याच्या साथीदारांनी गेल्या तीन ते चार महिन्यात औरंगाबाद शहराच्या विविध भागातून तीन ते चार चंदनाची झाडे चोरून नेली असून चोरलेले चंदन त्यांनी आडगाव माऊली येथील एका व्यापाNयाला १ हजार ६०० रूपये किलो प्रमाणे विक्री केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका चंदनाच्या झाडाची रेकी करून ठेवली असल्याचे नसीब खॉ याने पोलिसांना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!