Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionResult : मोदी – शहा यांनी मानले बिहारी जनतेचे आभार !! म्हणाले सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रावर मतदारांचा विश्वास

Spread the love

पुन्हा एकदा बिहारच्या एनडीएला बहुमत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य रात्रीच्या सुमारास एकामागून एक ट्विट करत बिहारमधील  जनतेचे आभार मानले. बिहारच्या जनतेने विकासाला प्राध्यान्य दिले. प्रत्येक मतदाराने आपलं स्वप्न आणि आपेक्षा काय आहेत? हे आपल्या मतदानातून दाखवून दिलं, असे  पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनीही   ट्विट करून बिहारच्या  जनतेचे  आभार मानले. बिहारने जगासमोर लोकशाहीचे एक मोठे उदाहरण ठेवले आहे. लोकशाही कशी बळकट केली जाते हे बिहारच्या जनतेने दाखवले आहे. विक्रमी संख्येत बिहारमधील महिला, गरीब आणि वंचितांनी मतदान केलं. विकासाला मत देऊन आपला निर्णय दिला, असेही  पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


आपल्या एका पाठोपाठ एक ट्विट करीत मोदी यांनी म्हटले आहे कि , बिहारच्या गावे-गरीब, शेतकरी-मजूर, व्यापारी – दुकानदार अशा प्रत्येक वर्गाने एनडीएच्या सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रार विश्वास ठेवला. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला आश्वासन देतो, बिहारच्या संतुलित विकासासाठी झोकून देऊन सातत्याने काम करू. बिहारच्या भगिनी-मुलींनी यावेळी विक्रमी संख्येत मतदान करून आत्मनिर्भर बिहारमधील त्यांची भूमिक किती मोठी आहे हे दाखवून दिलं. गेल्या काही वर्षात बिहारमधील मातांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास एनडीएला संधी मिळाली आहे. हाच आत्मविश्वास बिहारच्या जनतेला पुढे नेण्यासाठी शक्ती देईल. हे नवीन दशक बिहारचे असेल आणि आत्मनिर्भर बिहार हा त्यांचा रोडमॅप असेल, हे बिहारच्या तरुणांनी स्पष्ट केलं आहे. तरुणांच्या या ऊर्जेने एनडीएला आधीपेक्षा आणखी मेहनत करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे, असंही  पंतप्रधान मोदींनी ट्विटमधून म्हटलं आहे.

दरम्यान या विजयावर भाजपनेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , बिहारमधील प्रत्येक वर्गातील नागरिकाने जातीवादाच्या राजकारणाला फेटाळून लावलं आहे आणि एनडीएच्या विकासाचा झेंडा फडकवला आहे. बिहारच्या प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा आणि आशांचा हा विजय आहे. नितीशकुमारांच्या डबल इंजिनच्या विकासाचा विजय आहे, असं म्हणत अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

बिहारमध्ये विकास, प्रगती आणि सुशासनाला पुन्हा निवडणूक दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. महिला आणि तरुणांनी सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एनडीएला निवडून दिलं आणि सरकार बनवलं, खास करून त्यांचे आभार. पंतप्रधान मोदींच्या धोरणांना जनतेने दाखवलेल्या उत्साहातून समर्थन दिले आहे. हे खरचं प्रशंसनिय आहे. करोना व्हायरस विरोधातील लढाईत गरीब, मजूर, शेतकरी आणि तरुणींनी मोदी सरकारवर विश्वास दाखवला आहे. एवढचं नव्हे तर देशाची दिशाभूल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे, असेही  शहा यांनी  ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!