AurangabadCrimeUpdate : १० हजार रु.ची लाच घेणार्या पोलिसाला बेड्या

औरंगाबाद- पैशाच्या व्यवहारातून मारहाण करणार्या इसमांवर कारवाई करण्यासाठी १० हजार रु.लाच स्विकारणार्या सातारा पोलिस ठाण्याच्या कर्मचार्याला एसीबी ने सकाळी बेड्या ठोकल्या.
भगवान जाधव(५५)धंदा नौकरी अंमलदार सातारा पोलिस ठाणेअसे अटक आरोपीचे नाव आहे. सातारा पोलिस ठाण्यात तक्रारदाराने पैशाच्या व्यवहारातून मारहाण करणार्या इसमांवर कारवाई करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणात आरोपी भगवान जाधव ने २०हजार रु.तक्रारदाराला मागितले होते. त्यापैकी १०हजार आधि मागितले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी जाधव च्या विरोधात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी सापळा रचून बुधवारी सकाळी १० वा. भगवान जाधव ला अटक केली. त्याच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे