Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BreakingNewsAurangabad : ताजी बातमी : अपहरणकर्त्यांच्या गाडीतील डिझेल संपल्याने , अपहृत बिल्डरच्या पायावर गोळी झाडून आरोपी फरार

Spread the love

हवेत फायरिंग करीत औरंगाबाद शहरात दिवसाढवळ्या ज्या  बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण  करण्यात आलं होतं त्या व्यक्तीच्या पायावर गोळीझाडून गाडीचे डिझेल संपल्याने अपहरणकर्त्यांनी पीडित बिल्डरला जखमी अवस्थेत सोडून पोबारा केला. शहरातील  देवा नगरी भागात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चित्तेपिपंळगाव ता औरंगाबाद परिसरात अपहृतकर्त्यांच्या टाटा कंपनीच्या इंडिको कारचे डिझेल संपल्याने  अज्ञात आरोपींनी अपहृत व्यक्तीच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी अवस्थेत गादीजवळच सोडून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला.  फरार आरोपींचा  चिकलठाणा आणि सातारा पोलीस शोध घेत आहेत . पीडित व्यक्तीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या  घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद ग्रामीणचे DYSP विशाल नेहुल आणि  चिकलठाणा पोलिस ठाण्याचे एपीआय विश्वास पाटील सर यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन आरोपींना शोधण्याची मोहीम अधिक गतिमान केली. या विषयीची अधिक माहिती अशी कि , हवेत फायरिंग करीत औरंगाबाद शहराच्या देवानगरी परिसरातून पांढऱ्या रंगांच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी नाझीम पठाण राउफ पठाण या बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण केलं होतं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहे.

या धक्कादायक घटनेप्रकरणी अधिक माहिती अशी की, बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराच बांधकामचा ठेका पठाण यांनी घेतला होता. आज सकाळी ते साईडवर आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्याचवेळी त्यांना धक्का देत यांना गाडीमध्ये ढकलत हवेत गोळीबार करून तेथून पसार झाले. बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले असता हल्लेखोरांनी तोपर्यंत पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!