Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : फ्रान्स मध्ये काय चाललंय ? दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या धडाकेबाज कारवाईत ५० ठार

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांनी फ्रान्समध्ये उच्छाद मांडला असून हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी फ्रान्स सरकारने आफ्रिकन देश मालीमध्ये असलेल्या अल कायदाच्या अतिरेक्यांवर फ्रान्सच्या हवाई दलाने जोरदार हवाई हल्ले सुरू केले. फ्रान्स हवाई दलाच्या मिराज लढाऊ विमाने आणि ड्रोन विमानांनी ही कामगिरी केली. मालीमध्ये केलेल्या हवाई कामगिरीत अल कायदाचे जवळपास ५० दहशतवादी ठार झाले. बुर्कीन फासो आणि नायजरजवळील सीमावर्ती भागात शुक्रवारी हा एअर स्ट्राइक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याबाबत फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या हवाई दलाने ३० ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. यामध्ये ५० अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. त्याशिवाय त्यांच्या शस्त्रसाठ्याचेही नुकसान झाले आहे. चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात फ्रान्सच्या सैन्याला यश आले आहे. त्यांच्याकडून आत्मघाती हल्ल्यासाठी वापरण्यात येणार कोट, स्फोटकेही सापडली आहेत. एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा अल कायदाशी संबंध होता. हे दहशतवादी ग्रुप ऑफ इस्लाम अॅण्ड मुस्लिम संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती फ्रान्स सरकारने दिली. हे दहशतवादी एकत्रपणे गटाने झुंडीने मोटारसायकलवरून प्रवास करत होते. त्यावेळी फ्रान्सच्या ड्रोनने यांना पाहिले आणि त्यानंतर एअर स्ट्राइकची कारवाई करण्यात आली.

गेल्या आठवड्यांपासून फ्रान्समध्ये इस्लामिक कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तणावाचे वातावरण आहे.  अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धडा शिकवताना या शिक्षकाने चार्ली हेब्दोमध्ये प्रकाशित झालेल्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवले एका शिक्षकाने दाखवले होते. त्यानंतर एका कट्टरपंथीय मुस्लिम युवकाने त्या शिक्षकाची हत्या केली. या घटनेनंतर फ्रान्समध्ये जोरदार कारवाई सुरू करण्यात आली.  त्यामुळे कट्टरवादी संघटना, संस्था सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आल्या. या घटनेची दखल राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी देखील घेतली होती. तर, काही दिवसांपूर्वीच चर्चमध्ये एकाने तिघांची हत्या केली. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. या हल्ल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!