Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : फौजदाराला एक लाखाची लाच घेताना पकडले

Spread the love

नाशिकमधील सराफाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  संगमनेरमधील एका फौजदाराला बेड्या ठोकण्यात आल्या . पीएसआय राणा प्रतापसिंह परदेशी असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे. चोरीचे सोने खरेदी केल्याच्या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी या फौजदाराने फिर्यादी सराफाकडे दोन लाखाची लाच मागितली होती . त्यापैकी एक लाखाची लाच स्वीकारताना हा फौजदार सापळ्यात अडकला. या प्रकरणातील आरोपीने स्वतःच्याच घरात चोरी करून सोन्याचे दागिने लंपास केले होते .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यात घरफोडी झाली होती. या घरफोडीत  आरोपी मुलाने स्वतःच्याच घरातून दागिन्यांची चोरी केली होती. वडील आजारी असल्याने आई त्यांच्यासोबत नाशिकला होती. याचा गैरफायदा घेऊन मुलाने मित्राच्या मदतीने स्वत:चेच घर फोडले. घरातून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरले. ते दागिने नाशिकच्या सराफाला विकले. आपले वडील आजारी असल्याने पैशांची गरज आहे, असे कारण सांगून त्याने हे दागिने विकले होते. त्या पैशांतून गोव्यात जाऊन त्याने मौजमजा केली. या प्रकरणाचा तपास परदेशी यांच्याकडे होता. त्यांनी आरोपींच्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक पद्धतीने तपास केल्यावर आरोपी गोव्यात असल्याचे समजले. त्यानुसार परदेशी यांनी पथकासह जाऊन आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी ज्याला सोने विकले, त्या नाशिकमधील सराफाचे नाव सांगितले होते.

दरम्यान  या गुन्ह्यात सराफालाही आरोपी करण्याचा धाक दाखवून पैसे उकळण्याचा अटक फौजदाराचा हेतू होता त्यानुसार त्याने सराफाकडे तब्बल दोन लाखांची लाच मागितली. मात्र लाच देण्याची सराफाची इच्छा नसल्याने  त्यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे संपर्क साधून तक्रार दिली. त्यावरून पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संगमनेर पोलीस ठाण्यात सापळा रचला. तेथे एक लाख रुपयांची लाच घेताना परदेशी यांना पकडण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!