Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : कमळापूर शिवारातील खुनाचा उलगडा, आरोपीला २४ तासात अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी २१ आॅक्टो रोजी शहरात वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर शिवारातील झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पुण्याहून अटक करुन आणले. कृष्णा सूर्यभान ताठे(२०) रा. रांजणगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. याने त्याच्या ओळखीचे भीमराव दिगंबर सावते(३२) यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Advertisements

भीमराव सावते आणि कृष्णा ताठे यांची ओळख असून काही दिवसांपूर्वी सावते ने ताठे ला मित्रांसमोर पाईपने मारले होते. त्याचा राग मनात धरुन ताठे ने भीमरावचा धारदार शस्राने खून केला. घटना घडल्या नंतर पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी ताठे च्या मामा ला ताब्यात घेत चौकशी केली.त्यांच्याशी बोलण्यावरुन ताठे चा मित्र ओम कांबळे ही गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी कांबळे ला त्याच्या नातेवाईकामार्फत फोन लावून त्याचा ठाव ठिकाणा विचारला.तो पुण्यातील रविवार पेठेत असल्याचे कळले. त्यानंतर त्वरीत पीएसआय बांगर यांना पथकासह सावंत यांनी पुण्याला पाठवले. रविवार पेठेतून कांबळेला ताब्यात घेतल्यावर पिंपरी चिंचवड मधून क ष्णा ताठे ला ताब्यात घेऊन बांगर यांचे पथक औरंगाबादला पोहोचले. वरील कारवाईत पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय विजय घेरडे, पीएसआय बांगर, गंभीरराव, पोलिस कर्मचारी दिपक मतलबे, खय्यूम पठाण यांनी सहभाग घेतला होता.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!