Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona MaharashtraUpdate : दिलासादायक : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, रुग्णांच्या उपचार दरातही मोठी वाढ

Spread the love

गेल्या  २४ तासात राज्यात आज ३०९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १० हजार ७९२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजही तब्बल १० हजार ४६१ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधीत रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंता वाढवली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाची लाट ओसरताना दिसत आहे. काल, तब्बल २६ हजार इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे झाले होते. आजही १० हजार ४६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ लाख ६६ हजार २४० इतकी झाली आहे. व राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८२. ८६ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान राज्यात आज १० हजार ७९२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख २८ हजार २२६ इतकी झाली आहे. तर, आज ३०९ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण मृतांचा आकडा ४० हजार ३४९ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७६,४३,५८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,२८,२२६ (१९.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,१०,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान पुणे शहरातील रुग्णसंख्या आता घटत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून गंभीर रुग्णांसह सक्रिय रुग्णांच्या संख्येवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रुग्णालयात ऑक्सिजनवरील रुग्णांच्या संख्या आता २६७७ वरून येऊ थांबली आहे. ही संख्या देखील घटत असल्याने दिलासा मिळत आहे. पुणे शहरात रुग्णसंख्या घटत असल्याने त्याचा मोठा दिलासा पुणेकरांना मिळत असला तरी नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुढे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. शहरात विविध स्वॅब केंद्रावरून १ लाख ५४ हजार २३० एवढ्या चाचण्या आतापर्यंत झाल्या आहेत. रविवारी एका दिवसात ४२६९ एवढ्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ६३० जणांना संसर्ग झाल्याचे निदान झाले. ८५८ रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यामध्ये ४५३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर ४०५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.
पुण्याबरोबरच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईची स्थितीही आता पुन्हा सुधारत आहे. सप्टेंबरमहिन्यात मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीच्या संख्येनं उसळी घेतली होती त्यातुलनेनं ऑक्टोबर महिन्यात करोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्याचबरोबर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मुंबईमध्ये मागील ९ दिवसांत १९ हजार ९०६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १९ हजार ७५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

ऑक्टोबरमध्ये रिकव्हरी रेट २ टक्क्यांनी वाढला आहे तर, डबलिंग रेट १ दिवस जास्त झाला आहे. मुंबईत चाचण्यांचे प्रणाण वाढवली आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं करोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं, आता हळूहळू पुन्हा मुंबईची स्थिती अजून सुधारेल, असं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!