Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक बातमी : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या होतेय कमी…

Spread the love

गेल्या २४  तासात राज्यात ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात आज ३०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे . दिलासा देणारी बाब म्हणजे आज एकाच दिवशी २६ हजार ४४० इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले असून सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ८२.७६ टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा आज २ लाख २१ हजार १५६ इतका खाली आला आहे. राज्यातील करोना मृत्यूंचा आकडा वाढतच चालला आहे. आज ३०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. राज्यात २६ हजार ४४० इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १२ लाख ५५ हजार ७७९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ (२०.०५ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२ लाख ६८ हजार ५७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर २४ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन मध्ये आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!