Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पोलिस उपायुक्त राहुल खाडे यांच्यासह एसीपी गुणाजी सावंत यांची बदली

Spread the love

औरंंंगाबाद : पोलिस दलातील बदल्यांचा नारळ अखेर पुâटला असून गृहमंत्रालयाने उपायुक्त दर्जाच्या अधिकाNयांसह सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाNयांच्या बदल्या केल्याचे आदेश बुधवारी (दि.३०) रात्री जारी केले. पोलिस आयुक्तालय परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांची अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. तर छावणी विभागाचे सहाय्यक आयुक्त गुणाजी सावंत यांची मुंबईला सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली.
पोलिस दलातील उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा असलेल्या अधिकाNयांच्या बदल्या गेल्या एक ते दोन महिन्यापासून रखडल्या होत्या. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाNयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नाशिक येथील अप्पर पोलिस अधीक्षक दिपक गि-हे यांची बदली करण्यात आली आहे. तर तासगाव येथील उपअधीक्षक अशोक बनकर यांची औरंगाबादला सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद ग्रामीण पोलिस मुख्यालयातील अपअधीक्षक विवेक सराफ यांची औरंगाबाद पोलिस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादच्य दहशतवाद विरोधी पथकातील अपअधीक्षक गणेश बिंद्रे यांची सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे अपअधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!