Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : मंदिर आणि मशिदीमध्ये पोहोचण्याआधीच पोलिसांनी संपवले खा. इम्तियाज जलील यांचे आंदोलन

Spread the love

राज्यातील मशिदी उघडण्यासाठी आंदोलन करीत परवानगी नसतानाही मशिद उघडून नमाझ अदा करण्यासाठी जाणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  दरम्यान राज्यातील मंदिरं आणि मशिदी उघडाव्यात य मागणीसाठी खा. इम्तियाज जलील यांनी मंदिर प्रवेश  आणि मशीद उघडण्याचा इशारा दिला होता. मात्र काल शिवसेनेचा चढाईमुळे त्यांनामंदिर उघडण्याचे आंदोलन मागे घावे लागले होते . आज ते मशीद उघडून नामजसाठी निघाले होते मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच खबरदारी म्हणून खासदार जलील यांना पोलिसांनी  मशिदीत पोहोचण्याआधीच ताब्यात घेतले.

आठवडाभरापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी शहरातील शहागंज येथील मशिदीत प्रवेश करून नमाझ अदा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी त्याआधीच कारवाई करत खासदार जलील यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे शहागंज मशिद परसरात एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मशीद परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. या आंदोनापूर्वीच मशिदीत  नमाज अदा करण्यात आली होती त्यामुळे  खासदारांच्या आंदोलनाची अडचण झाली. तरीही मशिदीत नमाज अदा करण्यासाठी निघालेल्या खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन इम्तियाज जलील यांना पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले.

दरम्यान एमआयएमचे काही कार्यकर्ते शहागंजच्या मशिदीजवळ आंदोलन करण्यासाठी जमा झाले. त्यांनी घोषणा बाजीही केली. जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेताच, या कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्तालयाकडे धाव घेतली. जलील यांच्यासह नासेर सिद्दीकी, फेरोज खान आणि अजीम अहेमदसह समीर साजेद यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात कार्यकर्ते जमा झाले. या ठिकाणी खासदारांना सोडेपर्यंत हलणार नसल्याच्या घोषणा देण्यात आल्या. काही वेळानंतर खासदार जलील यांना पोलिसांनी सोडून दिले.

आपल्या आंदोलनाबाबत बोलताना खा. इम्तियाज जलील म्हणाले कि , आमचं आंदोलन हे प्रतिकात्मक होतं. आम्ही मशिदीत हजारोंच्या संख्येने जाणार नव्हतो. मोजक्याच लोकांना घेऊन आम्ही मशिद उघडून नमाझ अदा करणार होतो. मात्र, त्यासाठीच पोलिसांनी आम्हाला रोखलं आणि ताब्यात घेतलं. मात्र, राज्य शासनानं धार्मिकस्थळं लवकरात लवकर उघडावीत, अशी आपली शासनाकडे मागणी असून शहागंजमधील मशिद परिसरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये किंवा प्रवेश करू नये, असे आवाहन खा. जलील यांना केलं आहे.

दरम्यान, राज्यातील धार्मिकस्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा दिला होता. खासदार जलील मंदिरात प्रवेश करणार होते. तितक्यात एमआयएम मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला शिवसेनेनं कडाडून विरोध केला. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं होतं.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!