Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : सांगलीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही लागले नंबर !! तीन शिफ्ट मध्ये काम करताहेत कर्मचारी….

Spread the love

सांगली शहरात करोना संसर्गाचा उद्रेक झाला झाला असून.  रुग्णालयात व्हेंटिलेटरयुक्त खाटांची  मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने कोरोनाबाधित मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे रोज २५ ते ३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत असल्याने मिरजेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे. चिंताजनक रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांसमोर मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

सांगलीमध्ये जुलै महिन्यापर्यंत नियंत्रणात राहिलेल्या करोना संसर्गाचा ऑगस्ट महिन्यात उद्रेक झाला. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात २६४३ रुग्णांची नोंद होती, तर ७८ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. ऑगस्ट महिन्यात मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. गेल्या महिनाभरात सांगलीत तब्बल ९७५१ नवे रुग्ण आढळले, तर ४७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ४९५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५६९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने मृत्यूदर वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून रोज २० ते ३० रुग्ण दगावत आहेत.

दरम्यान सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात मिरज-पंढरपूर मार्गावरील एकाच स्मशानमभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था केली आहे. अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी दिवसभर प्रतीक्षा करावी लागते. वेळेत अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडे हात जोडण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर आली आहे. तालुका स्तरावर अंत्यसंस्काराची व्यवस्था असली तरी, बहुतांश रुग्ण मिरज आणि सांगलीतील कोविड रुग्णालयात दाखल असल्याने उपचारादरम्यान दगावलेल्या रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मिरजेत पाठवले जातात. अंत्यसंस्कारासाठी तीन शिफ्टमध्ये २४ कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. या कर्मचाऱ्यांवरील ताण कमालीचा वाढला आहे. अंत्यसंस्कारही वेळेत होऊ नयेत, अशी दुर्दैवी वेळ सांगलीकरांवर ओढवली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!