Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जेईई व नीट परीक्षेच्या मुद्यावरून केंद्राने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकावा , सोनिया -राहुल यांचा व्हिडीओ संदेश

Spread the love

केंद्र सरकारने घोषित केलेल्या जेईई व नीट परीक्षेच्या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या व्हिडिओतून देशभरातील विद्यार्थ्यांना उद्देशून भाष्यं केलं असून  विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांना विचारात घेऊनच घ्यायला हवा, असा सल्ला देखील सरकारला दिला आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही  नीट आणि जेईई परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असे मत व्यक्त करीत सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे असे म्हटले आहे. याबात पीटीआयने  वृत्त दिलं आहे.

तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका अशी विनंतीही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोना संकटाचा सामना कऱण्यात असमर्थ ठरल्याचा आरोप केला आहे. सरकारने आपला निर्णय विद्यार्थ्यांवर लादता कामा नये असंही ते म्हणाले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ‘स्पीक अप फॉर स्टुडंट सेफ्टी’ मोहिमेअंतर्गत आपले  व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. यात राहुल गांधी यांनी , सरकारने कोरोना संकट योग्यप्रकारे हाताळलं नाही असं प्रत्येकाला वाटत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झालं. लोकांना यातना सहन कराव्या लागल्या . भारत सरकारला मला सांगायचं आहे की, तुम्ही आधीच करायचं तेवढं नुकसान केलं आहे. आता तरी देशातील विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐका आणि मग शांततेत उपाय शोधा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!