Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : तलावात बुडाल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : वाल्मी परिसरात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ही दुदैवी घटना मंगळवारी (दि.२५) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. रोहित दत्ता शिंदे (वय १२, रा.विटखेडा, पैठण रोड) असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव आहे.

Advertisements

रोहित शिंदे हा मंगळवारी दुपारी वाल्मी परिसरात असलेल्या तलावात पोहण्यासाठी मित्रासोबत गेला होता. तलावातील पाण्यात उतरल्यावर खोल पाण्याचा त्याला अंदाज न आल्यामुळे त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने तो बुडाला होता. हा प्रकार सोबतच्या मुलांनी तलावाजवळ असलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आणून देत याची माहिती अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख आर.के.सुरे, एल.एम.गायकवाड, ड्युटी इनचार्ज शरद घाटेशाही, सुजीत कल्याणकर, मयूर कुमावत, प्रसाद शिंदे, इरफान पठाण, अप्पासाहेब गायकवाड, संघदिप बनकर, मनोज राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाNयांनी अर्धा तास पाण्यात शोध घेवून रोहित शिंदे याला बेशुध्दावस्थेत बाहेर काढुन उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या घटनेची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!