Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : शरद पवार यांनी दिली सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीवर प्रतिक्रिया

Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणी  सर्वोच्च न्यायालयाने पुढील तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना , सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल अशी प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे. मात्र हे लिहीत असतं त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये  ज्येष्ठ विज्ञानवादी विचारवंत डॉ . नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करताना म्हटले आहे कि , ‘मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय मार्फत 2014 मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.’

दरम्यान २०१४  रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. मात्र अद्यापही योग्य न्याय न मिळाला नाही. याची पुनरावृत्ती होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या  पुण्यस्मरण दिनी शरद पवार यांनी ट्वीट करून अभिवादन केलं आहे. दाभोलकरांनी अंधश्रद्धेविरोधातात, अनिष्ठ रुढींविरोधात आवाज उठवला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!