Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate :  गेल्या २४ तासात राज्यात १४ हजार ४९२ रुग्णांची उच्चांकी वाढ तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१ टक्क्यांवर

Spread the love

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचाराचा दर वाढत असला तरी ,  गेल्या २४ तासात राज्यात उच्चांकी म्हणजे १४ हजार ४९२ रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडाही काळजी वाढवणारा आहे. आज दिवसभरात ३२६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ इतका झाला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत सध्या १ लाख ६२ हजार ४९१ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान एकीकडे राज्यातील रुग्णांचा आलेख वाढत असताना एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज तब्बल १२ हजार २४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला  तर आतापर्यंत राज्यात आत्तापर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३७ टक्के इतका झाला आहे. राज्यातील वाढत रिकव्हरी रेट हि राज्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. राज्यात सध्या ११ लाख ७६ हजार २६१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३६ हजार ६३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ३२६ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांची संख्या २१ हजार ३५९ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर ३.३२ टक्के इतका झाला आहे. तर, राज्यात आतपर्यंत ३४ लाख १४ हजार ८०९ चाचण्यांपैकी ६ लाख ४३ हजार २८९ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!