Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 12025 : 359 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर, 7 जणांचा मृत्यू , जिल्ह्यात 6690 कोरोनामुक्त, 4921 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 193 जणांना (मनपा 135, ग्रामीण 58 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 6690 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 359 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12025 झाली आहे. आजपर्यंत एकूण 414 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4921 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 256 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 24, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 125 आणि ग्रामीण भागात 106 आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण (107)
समता नगर, सिल्लोड (1), औरंगाबाद (13), फुलंब्री (3), गंगापूर (24), खुलताबाद (1), वैजापूर (56), पैठण (9)
सिटी एंट्री पॉइंट (24)
पैठण (1), गारखेडा (1), चित्तेगाव (4), अजिंठा (1), समृद्धी महामार्ग कर्मचारी (1)
रामचंद्र नगर (1), वाळूज (2), बजाज नगर (4), रांजणगाव (2), वडगाव (1), उस्मानपुरा (1)
शिवाजी नगर (2), अन्य (3)
तीन कोरोनाबाधिताचा मृत्यू
घाटीत उमाजी कॉलनीतील 65 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात बालाजी नगरातील 72 आणि जुना बाजार येथील 64 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

UPDATE: 4:55PM

जिल्ह्यात 4861 रुग्णांवर उपचार सुरु,चार रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 04 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 11769 कोरोनाबाधित आढळले आहे. त्यापैकी 6497 बरे झाले, 411 जणांचा मृत्यू झाला , तर 4861 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीतील रुग्ण(3)
पद्मपुरा (2), छावणी परिसर(1)
ग्रामीण भागातील रुग्ण(1)
वाळूज (1)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत रामनगरातील 42 वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनीतील 65 वर्षीय पुरुष, कासंबरी दर्गाजवळ पडेगाव येथील 55 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Morning Update

जिल्ह्यात 4860 रुग्णांवर उपचार सुरू, 99 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 99 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 11765 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6497 बरे झाले, 408 जणांचा मृत्यू झाला. तर 4860 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील (56)
जवाहर कॉलनी (4), साई नगर, सातारा परिसर (1), मोतीवाला नगर (1), एमजीएम हॉस्टेल परिसर (1), टाऊन सेंटर (1), एन सहा संभाजी कॉलनी (3), इंदिरा नगर, गारखेडा (1), एन सात (1), म्हाडा कॉलनी, पीर बाजार (1), बिस्म‍िल्ला कॉलनी (5), स्वामी विवेकानंद नगर (1), क्रांती नगर (2), बन्सीलाल नगर (2), न्यू नंदनवन कॉलनी (1), छावणी (1), पद्मपुरा (1), तथागत नगर (1), राम नगर (1), इंदिरा नगर, गारखेडा (4), आंबेडकर नगर (3), ब्रिजवाडी (2), शिवाजी नगर (6), कासलवाल तारांगण परिसर,पडेगाव (1), शिवाजी नगर,गारखेडा (1), जवाहर कॉलनी (1), नारेगाव (2), पन्नालाल नगर (1), रोशन गेट (1), अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका (1), हर्सुल (1), भक्तीनगर, पिसादेवी रोड (1), गारखेडा (1), चिकलठाणा (1)
ग्रामीण भागातील रुग्ण (36)
औरंगाबाद (13), पैठण (05), हनुमान नगर, रांजणगाव (1), चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), साकळी बु. (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), श्रीराम नगर, बजाज नगर (2), वडगाव कोल्हाटी (1), खतखेडा, कन्नड (1), रांजणगाव, गंगापूर (1), महेबुबखेडा (3), पंचशील नगर, वैजापूर (5), जीवनगंगा,वैजापूर (1)
सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (7)
रांजणगाव (5), सिडको महानगर (2)
कोरोनाबाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळक नगरातील 78 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!